Bigg Boss marathi : 'बिग बॉस नको, मालिकाच बरी' ; रुपाली भोसलेला चाहत्यांकडून खास सल्ला

बिग बॉस २ ची खेळाडू रुपाली भोसले पुन्हा एकदा बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये सहभागी शक्यता आहे.
Rupali Bhosle
Rupali BhosleSaam Tv

मुंबई : बॉलिवूडसह मराठीत सर्वाधिक टीआरपी असलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस(Bigg Boss). सध्या मराठीत बिग बॉसचा चौथा सीझन सुरु होत आहे. आता पर्यंत बिग बॉसच्या तिन्ही सीझनने टेलिव्हिजनवर आपली हवा केली आहे. आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती चौथा सीझनमधील स्पर्धकांची. बिग बॉसमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार ही उत्सुकता नेहमीच असते. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या विचारशैलींनी बिग बॉसचे घर चांगलेच हादरवले आहेत. बिग बॉस २ ची तगडी खेळाडू रुपाली भोसले (Rupali Bhosle) पुन्हा एकदा बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये सहभागी शक्यता आहे.

Rupali Bhosle
Payad Marathi Movie : मराठी चित्रपटाचा जगात डंका; जगप्रसिद्ध 'फोर्ब्स मॅगझिन'ने घेतली 'पल्याड'ची दखल

सध्या रुपाली स्टार प्रवाहावरील 'आई कुठे काय करते' मालिकेत काम करत आहे. मालिकेतील संजना या भूमिकेने रुपालीला महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचवले आहे. तिला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. त्याचबरोबर रुपाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. तिच्या पोस्ट चहात्यांसाठी लक्षवेधी पोस्ट्स असतात. रुपालीने तिला बिग बॉस मराठी४ मध्ये गेस्ट म्हणून यायचे आहे असे सांगितले आहे. तिच्या या इच्छेनंतर सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगली असून रुपालीला बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे.

Rupali Bhosle
Mahabharat :'महाभारत' मालिका जुन्या आठवणींना उजाळा देणार, नव्या रुपात पाहायला मिळणार पौराणिक कथा

रुपालीने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'आस्क मी एनीथिंग' हा गेम खेळला होता. त्यात तिला तिच्या चाहत्यांकडून अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यात एका चाहत्यानं तिला 'बिग बॉस मराठी ४ मध्ये गेस्ट अपिरिअन्स करायला आवडेल का?', असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत रुपाली 'हो' असे म्हणाली. रूपालीच्या उत्तरानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिला असे न करण्याचा सल्ला दिला आहे. कमेंट्मध्ये 'रुपाली आई कुठे काय करते मालिकेतच छान दिसतेय', अशी ही प्रतिक्रीया दिली.

'बिग बॉस मराठी ४' मध्ये दिसणाऱ्या काही संभाव्य स्पर्धकांची यादीसमोर आली आहे. ज्यात अभिनेता हार्दीक जोशीचे नाव टॉपमध्ये आहे. बिग बॉस मराठीच्या भव्य दिव्य घराचे काम अजून सुरू असून कार्यक्रमाचे होस्ट महेश मांजरेकरच असणार आहेत. लवकरच ते बिग बॉसची तारीख ही जाहीर करणार आहेत. बिग बॉसच्या स्पर्धकांबरोबर मांजरेकरांनी खास प्रोमो देखील शूट करणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com