Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरातून गौतम विग बाहेर, सौंदर्या शर्माला अश्रू अनावर

बिग बॉसच्या घरातून गौतम विग 'बिग बॉस 16' मधून बाहेर, सलमानने नाव जाहीर करताच स्पर्धक झाले थक्क.
Gautam Vig Got eliminated from Bigg Boss 16
Gautam Vig Got eliminated from Bigg Boss 16Instagram @gautamvigim

Bigg Boss 16 Episode Update: टीव्ही वरील सर्वात जास्त वादग्रस्त शो म्हणजे 'बिग बॉस. 'बिग बॉस 16'चा अर्धा सीझन पूर्ण झाला आहे. तसेच शोच्या नियमांनुसार दर आठवड्याला एक एक स्पर्धक शोमधून बाहेर जात आहे. या आठवड्यात गौतम विग 'बिग बॉस 16' मधून बाहेर गेला. सलमान खानने ज्या पद्धतीने घराबाहेर जाणाऱ्या स्पर्धकांचे नाव सांगितले, ज्यामुळे टीना दत्ता आणि शालीन भनोत यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते.

Gautam Vig Got eliminated from Bigg Boss 16
Shriya Saran: बिनधास्त श्रीयानं विमानतळावरच सगळ्यांसमोर नवऱ्याला घेतलं चुंबन; नेटकरी भलतेच चिडले

या आठवड्यात गौतम विग, शालीन भनोत, टीना दत्ता आणि सौंदर्या शर्मा नॉमिनेट झाले होते. या चौघांवर घराबाहेर जाण्याची टांगती तलवार होती आणि जेव्हा स्पर्धकांना घराबाहेर काढण्याची वेळ आली तेव्हा सलमान खानने वीकेंड का वारमध्ये या चार स्पर्धकांची नावे घेतली. सर्वप्रथम सलमान खानने शालीन भनोतचे नाव घेत म्हटले की, शालीनला शोमधून बाहेर जायचे होते पण आता लोकांनी शालीनला कमी मते दिली आहेत. आता तो घराबाहेर जात आहे. पण एकाही स्पर्धकाने सलमान खानच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. (Celebrity)

सलमान खानने टीना दत्ताचे नाव घराबाहेर जाण्यासाठी जाहीर आणि हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. टीना घरातील एक स्ट्रॉंग स्पर्धक आहे. दुसरीकडे, सामलन खानचे बोलणे ऐकून शालीन भनोत त्याच्या जागेवरून उठतो. सर्वात शेवटी सलमान खान गौतम विगचे नाव घेतो आणि म्हणतो की गौतम 'आप घर से बाहर आये' (तू घरातून बाहेर ये). गंमत म्हणजे सलमान खानच्या या बोलण्यावर एकाही स्पर्धकाचा विश्वास बसत नाही, त्यामुळे 'बिग बॉस'ला गौतमचे नाव घ्यावे लागते. (TV)

गौतम विग घराबाहेर गेल्याने सौंदर्या शर्मा रडू लागली. घरात आल्यानंतर दोघांमध्ये खूप घट्ट नाते निर्माण झाले होते आणि दोघे एकमेकांना डेटही करू लागले. त्यामुळे जेव्हा गौतमचे नाव एलिमिनेशनमध्ये घेण्यात आले तेव्हा सौंदर्याला सर्वात वाईट वाटले. (Bigg Boss)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com