Bigg Boss Fame Celebrity Viral Video: 'बिग बॉस' फेम दादूस अडचणीत? हळदीच्या कार्यक्रमात केला हवेत गोळीबार, कारवाईची होतेय मागणी

Bigg Boss Fame Dadus Firing: हळदीनिमित्त दादूसचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता.
Santosh Chaudhari (Dadus) Open Fire In Haldi
Santosh Chaudhari (Dadus) Open Fire In HaldiSaam TV

Santosh Chaudhari (Dadus) Open Fire In Haldi: बिग बॉस फेम आणि आगरी कोळी गीतकार दादूस उर्फ संतोष चौधरी सध्या चर्चेत आहेत. वादक सचिन भांगरेच्या हळदीच्या कार्यक्रमात दादूस सहभागी झाले होते. दरम्यान गाणे गात असताना त्यांनी खिश्यातुन बंदूक काढत हवेत गोळीबार केला आहे.

हळदीच्या कार्यक्रमात केलेल्या या गोळीबाराचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. ही घटना मुंबईतील शिवडी येथील आहे. हळदीनिमित्त दादूसचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. दरम्यान सचिन भांगरे (नवरदेव) दादूसच्या बाजूला नाचत होता. (Latest Entertainment News)

Santosh Chaudhari (Dadus) Open Fire In Haldi
The Kerala Story Team Accident: हिंदू यात्रेत सहभागी होण्याआधी अदा शर्मासह 'द केरला स्टोरी' टीमचा अपघात

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. हा व्हिडीओ आर के मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून पोलीसांचा तपास सुरू आहे.  या संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलिसांचे एक पथक सचिन भांगरे यांच्या घरी गेले होते पण तेव्हा त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते.

या संदर्भात पोलिसांनी भांगरे कुटुंबाशी संपर्क साधला असता त्यांनी संतोष चौधरी यांनी वापरलेली बंदूक खेळण्यातली असल्याचा दावा केला आहे. असे असले तरी पुढील चौकशीसाठी पोलिस दादुस म्हणजेच संतोष चौधरी यांना पोलिस ठाण्यात बोलवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी काही गैर आढल्यास दादुसवर कारवाई देखील होऊ शकते.

बिग बॉस हिंदी फेम अब्दु रोजिक विरोधात देखील अशीच तक्रार दाखल करण्यात आली आहे. अब्दुने मुंबईत त्याचे रेस्टॉरंट सुरू केले आहे. त्याच्या रेस्टॉरंटच्या उद्दघाटन सोहळ्यादरम्यान गोल्डन बॉईज यांच्या बॉडीगार्डनी अब्दुच्या हातात लोडेड बंदूक दिली. अद्बुच्या हातातील लोडेड बंदुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अब्दुची तक्रार मुंबई पोलिसात केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com