
Bigg Boss Marathi 4 Latest Update: बिग बॉस मराठीची सुरुवात धडाकेबाज एन्ट्रीने झाली होती. पहिल्या दिवसापासून सुरु झालेल्या वादाला काही केल्या पुर्णविराम मिळत नव्हता. अजूनही बिग बॉस मराठीच्या घरात कधी कधी स्पर्धकांचे वाद विकोपाला जातात. पण सध्या वादाला कमी फाटे फुटताना दिसत आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरात सर्वच स्पर्धक गुण्यागोविंदाने राहण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता घरातील सर्व स्पर्धक मोठ्या भांडणानंतर एकत्र आलेले दिसून येणार आहेत. घरात आज एक अवॉर्ड सोहळा रंगणार असून त्यात चक्क विकास आणि अपूर्वाही जोडी रोमँटिक डान्स करताना दिसणार आहेत.
‘बिग बॉस’च्या घरातील कॅप्टन्सी टास्कमध्ये सर्वच स्पर्धकांनी राडा घातला. सर्व टास्क संपल्यावर मात्र घरात ‘बीबी अवॉर्ड शो’चा कार्यक्रम पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात घरातील स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. तसेच घरातील सदस्यांना या सोहळ्यात वेगवेगळ्या श्रेणीतील अवॉर्डही मिळणार आहेत.
याचा एक प्रोमो व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’च्या घरातील अवॉर्ड सोहळ्यात अपूर्वा नेमळेकर आणि विकास सावंतने ‘उह लाला’ या विद्या बालनच्या गाण्यावर रोमॅंटिक डान्स करताना दिसले. या डान्सची छोटी झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
डान्स संपल्यानंतर किरण माने विकास व अपूर्वाच्या मध्ये जाऊन बसल्यानंतर अपुर्वाने लगेच नाक मुरडल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. या अवॉर्ड सोहळ्यात अपूर्वा व विकास हे यांच्या जोडीला 'मेड फॉर इच अदर' या कॅटॅगिरी अंतर्गत ‘सर्वोत्कृष्ट धमाल जोडी’ हा पुरस्कार देण्यात आला. तर शोच्या शेवटी सगळ्या स्पर्धकांनी एकत्र बसून न भांडता एक छान फोटो काढला.
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरातून आतापर्यंत सहा स्पर्धक बाहेर पडले आहेत. तर किरण माने घराच्या बाहेर पडूनही स्पेशल पॉवरमुळे घरात कायम आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बिग बॉसमध्ये स्नेहलता वसईकरने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. आता पुन्हा घरात चार नवीन स्पर्धक येणार आहेत. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल चार स्पर्धक वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री घेणार आहेत. या सर्व स्पर्धकांचे चेहरे प्रेक्षकांना आजच्या आणि उद्याच्या चावडीवर दिसून येणार आहे.
तसेच आठवड्याभरात घरात हत्ती आणि राणी मुंगीच्या टास्कमध्ये अमृता धोंगडेने बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीचे केलेल्या नुकसानीमुळे अमृताला बिग बॉसने कठोर शिक्षा सुनावली होती. पण अमृताने केलेल्या कृत्याचा धडा न घेता सदस्यांनी घरात परत नको ते पाऊल उचलले.
विकास आणि रोहित यांच्यात झालेल्या मारामारीमुळे आता बिग बॉसने त्यांना जेलमध्ये टाकले आहे. विकास आणि रोहित जेलमध्ये गेल्याने घरात नवा ट्विस्ट आला. दरम्यान आता घरात आज आणि उद्या महेश सरांची चावडी रंगणार असून तिथे आठवड्याभरात घडलेल्या या गोष्टींचा हिशेब चुकता होईल याच्यात शंका नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.