Viral Video: बिग बॉस फेम विकासलाही लागले वेड, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल....

'वेड' गाण्यावर सुद्धा विकासाने भन्नाट डान्स केला आहे.
Vikas Sawant
Vikas Sawant Saam Tv

Vikas Sawant Dance Video: रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या 'वेड' चित्रपटाने सगळ्यांना वेड लावले आहे. अनेकजण 'वेड' चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सामान्य माणसापासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वजण या गाण्यावर रील बनून शेअर करत आहेत. 'बिग बॉस मराठी ४' मधील स्पर्धक विकास सावंत याने सुद्धा या गाण्यावरील एक व्हिडिओ शेअर केला आहे.

विकास सावंत हा 'बिग बॉस मराठी ४'मध्ये सहभागी झाला होता. विकास एक कोरियोग्राफर आहे. त्याला डान्स खूप आवड देखील आहे. तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये त्याला अनेकदा डान्स करताना पाहिल असेल. 'वेड' गाण्यावर सुद्धा विकासाने भन्नाट डान्स केला आहे.

Vikas Sawant
Urfi Javed Controversy: उर्फी जावेद- चित्रा वाघ यांच्या वादाला कायदेशीर वळण, उर्फीची महिला आयोगात तक्रार...

विकासने मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान आणि रितेश देशमुख यांच्या 'वेड लावलंय' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओ विकासचे मित्र सुद्धा त्याला साथ देत आहेत आणि त्याच्याबरोबर डान्स करत आहेत. त्यांच्या डान्स आणि चेहऱ्यावरील भाव कमाल आहेत.

या व्हिडिओला विकास कॅप्शन देखील दिले आहे. 'छोटा पॅकेट बडा धमाका टीम' असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. त्याचा हा व्हिडिओ रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. 'बिग बॉस'च्या घराबाहेर आल्यानंतर विकासाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

'वेड' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कमालीचं यश मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १६ दिवस झाले आहेत. या चित्रपटाची आणि त्यातील गाण्यांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये अजिबात कमी झालेली नाही. 'वेड लावलंय' या गाण्याला अजय-अतुल त्यांचेसंगीत आहे. हे गाणे विशाल ददलानी आणि अजय यांनी गायले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com