Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरातील वाइल्ड कार्डची एक्सिट: 'हे' ठरले टॉप 5 स्पर्धक

'बिग बॉस मराठी ४'मध्ये पार पडले मिड-वीक एव्हिक्शन.
Bigg Boss Marathi Mid-Week Eviction
Bigg Boss Marathi Mid-Week EvictionSaam Tv

Bigg Boss Marathi 4 Mid-Week Eviction: 'बिग बॉस मराठी ४' कालचा दिवस खूप महत्वाचा होता. काल 'बिग बॉस'च्या घरामध्ये मिड-वीक एव्हिक्शन झाले. बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांना हा धक्का होता. या मिड-वीक एव्हिक्शनमध्ये आरोह वेलणकरला घराच्या बाहेर जावे लागले.

Bigg Boss Marathi Mid-Week Eviction
Sonam Kapoor: सोनम कपूरने विकले करोडोचे घर, रिसेल प्रॉपर्टीतून झाला खच्चून फायदा

'बिग बॉस मराठी ४' फिनालेसाठी काहीच दिवस उरले आहेत. दरम्यान या आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरामध्ये ६ स्पर्धक होते. अपूर्वा नेमळेकर मागच्या आठवड्यामध्ये तिकीट टू फिनाले जिंकून सेफ झाली होती. त्यामुळे काल झालेल्या एव्हिक्शनमध्ये किरण माने, अक्षय केळकर, राखी सावंत, अमृता धोंगडे आणि आरोह वेलणकर यांच्या डोक्यावर टांगती तलवार होती.

'बिग बॉस'च्या घरामध्ये पार पडलेल्या या एव्हिक्शनमुळे सर्व स्पर्धकांच्या मनात धाकधूक सुरू होती. अक्षय आणि अपूर्वाने टॉप २ मध्ये ते एकमेकांना बघतात असे सांगितले. पण त्यानंतर सुरू झालेल्या खेळात अपूर्वाला अक्षय सेफ वाटला नाही. खेळाच्या शेवटी मैत्री समीकरणे बदलली आहेत. हे दोन्ही स्पर्धकांनी बोलून दाखवले.

'बिग बॉस'ने एव्हिक्शनच्या वेळी मांडलेला खेळ खूप रंजक होता. काही स्पर्धक डेंजर झोनपर्यंत जाऊन परत आले, तर काही घराबाहेर जाणार म्हणून रडू लागले. सर्व स्पर्धकांचे राखी टॉप फाइव्ह स्पर्धकांपैकी एक आहे असे म्हटले. प्रेक्षकांनी दिलेल्या कमी मतांमुळे दुसऱ्यांदा आरोह वेलणकर टॉप फाइव्हला मुखाला.

अखेर 'बिग बॉस मराठी ४' त्यांचे टॉप फाइव्ह स्पर्धक मिळाले. आता स्पर्धकांना उत्सुकता आहे ती फिनालेची. या रविवारी म्हणजे ८ जानेवारी २०२३ला 'बिग बॉस मराठी ४' अंतिम सोहळा पार पडणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com