Bigg Boss Marathi 4: किरण पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार?, स्पेशल पॉवर कोणाकोणाची खेळी करणार?

किरण मानेची पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एंट्री होणार आहे.
Bigg Boss Marathi 4
Bigg Boss Marathi 4Saam Tv

Bigg Boss Marathi 4 Latest Update: बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची सुरुवातच मोठ्या वादळी पद्धतीने झाली होती. प्रत्येक आठवडा स्पर्धकांसाठी फारच रंजक होत आहे. सोशल मीडियावर बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची चांगलीच चर्चा होत आहे. नुकतेच बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी ५० दिवस पूर्ण केले आहेत. बिग बॉसच्या घरातील टास्कसंबंधित सर्वांनाच उत्सुकता असते. प्रत्येक स्पर्धक आपआपला टास्क दिलेला मेहनतीने पूर्ण करण्यासाठी फारच धडपड करताना दिसतात.

Bigg Boss Marathi 4
Sara Ali Khan: साराने दिल्या एक्स बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा, ब्रेकअपनंतर पहिल्यांदा म्हणाली…

गेल्या आठवड्यात दोन स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार होते. त्यातील पहिली स्पर्धक यशश्री आणि दुसरा स्पर्धक किरण होता. किरणला बिग बॉसने विशेष सिक्रेट पॉवर दिली असून बिग बॉसच्या घरातील सदस्यांवर विशेष रुममध्ये बसून करडी नजर ठेवायची संधी त्याला मिळाली होती. त्याच्या पश्चात कोण काय बोलत आहे? यावर त्याची बारिक नजर आहे. पण आता या आठवड्यात पुन्हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Bigg Boss Marathi 4
Sajid Khan: साजिदच्या आयुष्यात वादाची वेगळी भूमिका, लहान वयातच गेला थेट तरुंगात !

हा ट्विस्ट सर्वांना आजच्या भागात अनुभवता येणार आहे. तो ट्विस्ट म्हणजे किरण मानेची पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एंट्री होणार आहे. काल बिग बॉसच्या घरात हत्ती- मुंगीच्या कॅप्टन्सीच्या कार्यात अमृता धोंगडे खूपच आक्रमक होताना दिसली.या टास्कमध्ये हत्तीच्या गळ्यात घंटा बांधणारी टीम विजयी होणार होती. दोन्ही टीमला एकत्र दोरी बांधलेली घंटा हत्तीच्या गळ्यात अडकवायची होती.

परंतु, टास्कदरम्यान दोन्ही टीमने एकमेकांच्या घंटा बांधलेल्या दोऱ्या ‘बिग बॉस’च्या घरातील जेलमध्ये टाकल्या. त्यानंतर अमृता देशमुखने घरातील लांब काठीच्या साहाय्याने त्या दोऱ्या काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, बिग बॉसने घरातील प्रॉपर्टी न वापरण्याची आधीच ताकीद दिली होती. अमृता धोंगडेने त्यानंतर आक्रमक रुप धारण करत कोणलाही न घाबरता थेट बिग बॉसच्या घरातील जेल तोडण्याचा प्रयत्न केला. आधी अमृताने हाताने जेलचे खांब काढण्याचा प्रयत्न केला होता.

Bigg Boss Marathi 4
Drishyam 2: अजय देवगणच्या ऑन स्क्रीन लेकीने केले वजन कमी, या डाएटने घटवले १७ किलो वजन

काही वेळानंतर तिने लाथ मारुन जेल तोडून टाकले. अमृताने केलेल्या या चुकीच्या कृत्याची शिक्षा बिग बॉसने तिला टास्क संपल्यावर सुनावली. घरातील प्रॉपटीचे नुकसान केल्यामुळे बिग बॉसने अमृता धोंगडेची दोन आठवड्यांसाठी कॅप्टन्सी पदाची उमेदवारीच रद्द केली आहे. त्यानंतर घरात अमृता रडताना दिसली होती. आता घरात किरण माने पुन्हा एंट्री घेणार आहेत. याचा सर्वाधिक आनंद अमृताला होतो. पण तिचा हा आनंद फार काळ टिकणार नाही.

Bigg Boss Marathi 4
Bakula Song: मनाला चटका लावणाऱ्या 'टीडीएम' चित्रपटातील 'बकुळा' गाणे घेणार प्रेक्षकांच्या मनाचा ठाव

किरण घरात पुन्हा एकदा परतताच अमृता, तेजस्विनी, प्रसाद त्याला मिठी मारत आपला आनंद व्यक्त करतात. अमृता धोंगडे आणि किरण मानेचं नातं तर बाप लेकीचे आहे असे ते नेहमी बोलतात. पण आता किरण तिला घरातील जागा दाखवून देणार हे नक्की आहे. घरात परतल्यावर स्पर्धकांवर करडी नजर ठेवल्यानंतर त्यांना रेटिंग द्यायचे टास्क बिग बॉसने किरणला दिले आहे. पण दरम्यान किरण माने सर्वात कमी रेटिंग अमृता धोंगडेलाच देतो. त्यामुळे ती चांगलीच दुखावली असून किरणबद्दल नाराजी व्यक्त करते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com