Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात होणार जबरदस्त राडा, दोन मैत्रिणी एकमेकींशी भिडणार

या टास्कदरम्यान दोन स्पर्धकांना नॉमिनेट केले जाण्याची शक्यता आहे. बिग बॉसने हा सर्वात मोठा निर्णय घेतला असून यावेळी घरातून दोन स्पर्धकांची एक्झिट होणार आहे.
Bigg Boss Marathi Latest Update
Bigg Boss Marathi Latest UpdateSaam Tv

Bigg Boss Marathi 4 Latest Update: सध्या मराठी प्रेक्षकांना 'बिग बॉस'चा चौथा सीझन चांगलाच पसंतीस पडत आहे. बिग बॉसच्या घरात एकमेकांमध्ये सध्या चांगलेच वादाचे खटके उडताना आपल्याला दिसून येत आहे. जरी त्यांची मैत्री बरीच चांगली असली तरी, टास्क दरम्यान त्यांची हमरी- तुमरी होत असते. सध्या या आठवड्यात बिग बॉसच्या घरात सदस्यांना 'सोसल तेवढेच सोशल' हे उपकार्य सोपवले आहे. त्या उपकार्या अंतर्गत सध्या घरात टास्क चालू आहे.

Bigg Boss Marathi Latest Update
Urfi Javed Viral Video: उर्फी जावेदनं यावेळी हद्दच ओलांडली; अंतर्वस्त्राऐवजी लटकावले २ मोबाइल, पाहा VIDEO

या टास्कदरम्यान दोन स्पर्धकांना नॉमिनेट केले जाण्याची शक्यता आहे. बिग बॉसने हा सर्वात मोठा निर्णय घेतला असून यावेळी घरातून दोन स्पर्धकांची एक्झिट होणार आहे. बिग बॉसने घरातील सदस्यांना त्यांच्या पाट्याही काढायला सांगितलेलं व्हिडीओमध्ये दिसतंय. त्यामुळे सदस्यांनाही मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. ते एकमेकांना धीर देत असल्याचंही व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

बिग बॉसच्या या दुहेरी एलिमिनेशच्या निर्णयामुळे सर्व सदस्यांच्या टेन्शनचा पारा वाढलेला दिसत आहे. आता बाहेर जाणाऱ्या स्पर्धकांपैकी कोण दोन सदस्य असणार हे आजच्या भागात कळेल. सोबतच आजच्या भागात बिग बॉसच्या घरात दोन चांगल्या मैत्रीणींमधील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. काल यशश्रीने सदस्यांवर केलेला प्रॅन्क तिच्यावरच उलटला आहे. प्रसाद तिच्यावर कमालीचा नाराज झालेला दिसून येत आहे.

Bigg Boss Marathi Latest Update
Bollywood Actor Homes: मन्नत, प्रतीक्षा....बंगल्यांची नावं ठेवताना सेलिब्रिटी काय विचार करतात? जाणून घ्या

नंतर अमृता धोंगडेने देखील प्रसादची चांगलीच खिल्ली उलडवलेली दिसत आहे. त्या वादात तिने तेजस्विनीला मध्ये आणले, ज्यावरून अमृता धोंगडे आणि प्रसाद मध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली पाहायला मिळली. यासर्व वादात प्रसाद बरोबर असल्याचे तेजस्विनीचे मत आहे. आज याच मुद्द्यावरून दोघींमध्ये कडाक्याचे भांडण होणार आहे. तेजस्विनी अमृताला सांगत आहे की, मला जे खरंच लागलं आहे त्याला तू प्रॅन्क बोलीस मी खरं भांडायला पाहिजे.

की मी वेड्यासारखं तुझ्याकडे प्रेमाने आले तर तू त्याला ओरडून सांगते काय संबंध? त्याला ओरडून सांगायची काय गरज? तो कुठल्या मूडमध्ये आहे, तो तिथे डिस्टर्ब आहे. अमृता म्हणाली, अगं मी मस्करी करत होते. तुझ्यावरून नाही बोलले मी. तेजस्विनी म्हणते, मला त्याचं का valid वाटतं, तो झोनच वेगळा आहे, त्या माणसाला बोलावून दुसऱ्या प्रॅन्क बद्दल काय बोलायचे. काही संबंधच नाही.

Bigg Boss Marathi Latest Update
Goshta Eka Paithanichi: स्वप्नांसाठी जगणाऱ्या गृहिणीची प्रेरणादायी गोष्ट; 'गोष्ट एका पैठणी'चा भरजरी ट्रेलर बघा!

अमृता धोंगडे म्हणाली, त्याने खूप विषय वाढवला. तेजस्विनी म्हणाली, एकाच बाजूने नव्हतं तू पण बोलत होतीस. अमृता म्हणाली, तो किती बोला मला. हे शेवटचं बोलीस मला.. तेजस्विनीचे म्हणणे आहे, मुद्दा वाढवायची गरजचं नाहीये हा…

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com