Bigg Boss Season 4: स्पर्धकांना मिळाला दुसरा कॅप्टन; दुसऱ्या उपकार्यातून मिळाला नवा कॅप्टन

अक्षय केळकर आणि रोहित शिंदे या दोघांमध्ये विमानतळ हे कार्य पार पडले. यामध्ये रोहित शिंदे हा दुसऱ्या आठवड्यातील कॅप्टन बनला आहे.
Bigg Boss 2nd Captain
Bigg Boss 2nd Captain Saam Tv

मुंबई: बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची सुरुवात भांडणानेच झाली. तसेच बिग बॉसच्या घराची सुरुवात झाल्यापासून बऱ्याच स्पर्धकांना नॉमिनेशनला ही सामोरे जावे लागले होते. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या चौथ्या पर्वातील समृद्धी पहिली कॅप्टन झाली होती. आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती बिग बॉसच्या घरात पुढील कॅप्टन कोण? दुसऱ्या आठवड्यात रोहित आणि अक्षय या दोघांमध्ये लढत झाली आहे. घरात दुसऱ्या आठवड्यातील कॅप्टन्सीचे कार्य पार पडले. (Bigg Boss) (Marathi Entertainment News)

Bigg Boss 2nd Captain
Mili Teaser: जान्हवी कपूर देत आहे मृत्यूशी झुंज, फ्रीजमध्ये अडकलेल्या जान्हवीची होईल का सुटका?

बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच महिला कॅप्टन झाली होती. ती कॅप्टन होती समृद्धी. आता दुसऱ्या आठवड्यात रोहित शिंदे आणि अक्षय केळकर या दोघांमध्ये कॅप्टन्सी कार्य पार पडले होते. कॅप्टन्सीसाठी पहिल्यांदा बिग बॉस विमानतळ हे कार्य पार पडले असून या कार्यातून अक्षय आणि रोहित यांची कॅप्टन पदाच्या शर्यतीसाठी निवड करण्यात आली होती. विमानतळावर बिग बॉसच्या सर्वच खेळाडूंनी चांगलाच हंगामा घातला होता. अक्षय आणि रोहित या दोघांमधून एकाची निवड करण्याकरिता पार्किंगचे कार्य पार पडले होते. यामध्ये दोन्ही टीममध्ये चांगलीच चढाओढ पहायला मिळाली होती. दोन्ही टीममध्ये कॅप्टन पदासाठी चांगलेच वाद होताना दिसले.

Bigg Boss 2nd Captain
36 Gunn Trailer: '३६ गुण नाहीतर आकडा जुळलाय...', तरुणांना नवा विचार देणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

पार्किंग किंगमध्ये दोन्ही टीममधील बऱ्याच स्पर्धकांमध्ये भांडणे होताना दिसली. जेवढी बिग बॉसच्या घरात भांडणे झाली तेवढीच ते धम्माल करताना दिसले. पार्किंगचा टास्क रोहित शिंदे जिंकल्याने या आठवड्यातील कॅप्टन बनला आहे. कॅप्टनपद मिळाल्याने रोहित एका आठवड्यासाठी सेफ झाला आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात एक नाही दोन नाही तब्बल आठ स्पर्धकांना नॉमिनेशन मिळाले होते. त्यामध्ये या आठवड्यातील नॉमिनेशनसाठी रोहित शिंदे आणि अक्षय केळकर हे दोघेही होते. त्यांच्या कामगिरीने बिग बॉसच्या घराला नवा कॅप्टन मिळाला आहे.

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com