
मुंबई: 'बिग बॉस मराठी 4'ची (Big Boss) सुरूवात होऊन काहीच दिवस झाले आहेत. पहिल्या दिवसापासूनच घरात वाद सुरू झाले आहेत. प्रत्येकजण समजावत आणि समजून घेत स्पर्धक घरात वावरत आहेत. परंतु टास्क आणि त्यांनतर भांडण ही बिग बॉसच्या घराची परंपरा आहे. काल घरामध्ये गरबा नाईट साजरी झाली. आता स्पर्धकांसह प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती बिग बॉस मराठीच्या घरात पहिला कॅप्टन कोण होणार याची.
बिग बॉस मराठीमध्ये पहिल्या दिवसापासूनच चुरस पाहायला मिळाली. नॉमिनेशन, टास्क यामुळे गटबाजीला सुरुवात झाली आहे. अपूर्वा आणि प्रसाद यांना संचालक नेमून एका कार्याचा एकत्र निर्णय द्यायचा होता. दोघेही या कार्यात अपयशी झाले. कालच्या चान्स पे डान्स या उपकार्यात टीम ए विजयी ठरली. त्यात बिग बॉसमध्ये श्रेयश तळपदेची सुद्धा एन्ट्री झाली.
बिग बॉस मराठीची आजच्या दिवसाची सुरूवात ' ये रे ये रे पैसा' या गाण्याने झाली. तर या पर्वाचे पहिले कॅप्टन्सीचे कार्य पैशांवर आधारित आहे. कालच्या उपकार्यातील विजयी टीमला कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्याची संधी मिळाली आहे. किरण माने, रुचिरा जाधव, प्रसाद जवादे आणि रोहित शिंदे हे सदस्य कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीमधून एलिमनेट झाले आहेत.
"आज बिग बॉसच्या घरात पडणार आहे पैशाचा पाऊस आणि या पावसाचा आनंद लुटणाऱ्या उमेदवाराला मिळणार आहे पहिलं कॅप्टन पद मिळवण्याचा बहुमान. आपल्यासोबतच अवघा महाराष्ट्र उत्सुक आहे हे बघण्यासाठी बिग बॉस मराठी सिझन चारच पहिला कॅप्टन कोण होईल. त्यामुळे सुरू करूया बिग बॉस मराठी सिझन चारचे पहिले कॅप्टन्सी कार्य !”, असे बिग बॉसने स्पर्धकांना सांगितले आहे. त्यामुळे आज बिग बॉसच्या घरत काय होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.