...तो माझ्यावर अ‍ॅसिड फेकणार होता!; अभिनेत्री अक्षरा सिंहचा धक्कादायक खुलासा

बिग बॉस (Bigg Boss) ओटीटी (OTT) शेवटच्या काही टप्यात आहे. शोमधून बरेच स्पर्धक बाहेर पडले आहेत
...तो माझ्यावर अ‍ॅसिड फेकणार होता!; अभिनेत्री अक्षरा सिंहचा धक्कादायक खुलासा
...तो माझ्यावर अ‍ॅसिड फेकणार होता!; अभिनेत्री अक्षरा सिंहचा धक्कादायक खुलासाSaam Tv

मुंबई: बिग बॉस (Bigg Boss) ओटीटी (OTT) शेवटच्या काही टप्यात आहे. शोमधून बरेच स्पर्धक बाहेर पडले आहेत, त्यापैकी एक भोजपुरी सुपरस्टार अक्षरा सिंह (Akshara Singh) देखील आहे. शो सोडल्यानंतर अक्षरा सिंह एकामागून एक खुलासे करत आहे. ती अलीकडेच करण जोहरच्या बाबतीत बोलली होती, म्हणून आता तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अक्षरा तिच्या बॉयफ्रेंड आणि नैराश्याबद्दल उघडपणे बोलली आहे.

एका माध्यमांशी बोलताना तिने आपल्या ब्रेकअपबद्दल खुलासा केला आहे. अक्षरा सिंह म्हणते की, 'मला अनेक वेळा मारण्याची धमकी मिळाली आली माझे करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला परंतु माझ्या वडिलांनी मला साथ दिली. मी चिंता करणे थांबवले आहे. मला जीवनाची भीती नाही. मला खूप त्रास सहन करावा लागला ज्यामुळे मृत्यूची भीती संपली आहे. माझ्या एक्स बॅायप्रेंडने काही मुलांना अ‍ॅसिडच्या बाटल्या घेवून पाठवले होते आणि त्याला माझे करिअर उध्वस्त करायचे होते.

...तो माझ्यावर अ‍ॅसिड फेकणार होता!; अभिनेत्री अक्षरा सिंहचा धक्कादायक खुलासा
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार

अक्षरा पुढे म्हणते की 'काही मुलांनी हातात अ‍ॅसिडची बाटली घेऊन माझा पाठलाग देखील केला आहे. ते माझ्यामागे धावत होते. जे लोक रस्त्यावर ड्रग्ज घेत फिरतात त्यांना माझ्यामागे पाठवले गेले. मी फक्त देवाला प्रार्थना करते की कोणत्याही स्त्रीला मला ज्या सर्व गोष्टींमधून जावे लागले त्यामधून जायला लागू नये.

तिचा मुद्दा पुढे नेत अक्षरा म्हणाली, 'इंडस्ट्रीमध्ये मला कोणीही मदत केली नाही. असे अनेक लोक होते जे माझे सांत्वन करण्यासाठी आले होते परंतु त्यांच्यापैकी बहुतेकांनी मला तू अशी आहेस म्हणून तुझ्यासोबत हे घडत आहे. मला कोणी पाठिंबा दिला नाही. मी एका बाजूला होतो आणि संपूर्ण जग एका बाजूला होते. माझ्याकडे कोणतेही काम नव्हते. प्रत्येकाने कोणतेही कारण न देता माझ्यावर टिका केली. मी मुंबईत कसे जगले हे फक्त मला आणि माझ्या कुटुंबाला माहीत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com