
Bigg Boss OTT 2 Host: टेलिव्हिजनसह ओटीटीवर धुमाकूळ घालणारा ‘बिग बॉस’ नेहमीच चर्चेत राहिला आहे. नेहमीप्रमाणे टेलिव्हिजनवर चर्चेत राहणारा ‘बिग बॉस’ आता ओटीटीवर ही कमालीचा चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ओटीटीवर ‘बिग बॉस’ सुरू होतं. त्याच प्रमाणे त्याच्या होस्टची देखील चर्चा कमालीची होती. पहिल्या भागाचं होस्टिंग दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने जबाबदारी स्वीकारली होती. पण नुकतेच काही मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीप्रमाणे, ‘बिग बॉस ओटीटी’चा पुढील सीझन करण जोहर होस्ट करणार नाही.
‘बिग बॉस ओटीटी’ च्या दुसऱ्या सिझनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी करण जोहर स्विकारणार नसल्याने बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानकडे ही पुन्हा एक नवी जबाबदारी आली असल्याची माहिती मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला शोचा प्रीमियर होण्याची शक्यता आहे. हा शो प्रेक्षकांना तीन महिने ‘वूट’वर (VOOT) पाहता येणार आहे.
सध्या ‘बिग बॉस ओटीटी’ची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला सीझन २०२१ मध्ये पार पडला होता. आता त्या नंतर ‘बिग बॉस ओटीटी’पुन्हा कधी सुरू होणार याची चर्चा असताना, आता दुसऱ्या पर्वाची चर्चा होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वात स्टॅण्डअप कॉमेडियन आणि लॉकअप सीझन-१ चा विजेता मुनव्वर फारुकी सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या वर्षी तो, पासपोर्टच्या काही कारणांमुळे ‘खतरों के खिलाडी’च्या १२ व्या सीझनमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता.
‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सिझनमध्ये उर्फी जावेद सह जिशान खान, दिव्या अग्रवाल, शमिता शेट्टी, राकेश बापट, निशांत भट, प्रतीक सेहजपाल आणि नेहा भसीन सह अनेक स्पर्धक होते. एकूण १५ स्पर्धकांमधून ‘दिव्या अग्रवाल’ पहिल्या सिझनमध्ये विजयी झाली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.