Birthday Special: अमिताभ बच्चन यांचं ८० व्या वर्षात पदार्पण...

अमिताभ बच्चन यांचा सुर्यवंशम हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. याशिवाय हम, लाल बादशहा, बडे मिया छोटे मिया, कसमें वादे, द ग्रेट गैम्बलर या सिनेमांमध्ये त्यांनी डबल रोल साकारले आहेत.
Birthday Special: अमिताभ बच्चन यांचं ८० व्या वर्षात पदार्पण...
Birthday Special: अमिताभ बच्चन यांचं ८० व्या वर्षात पदार्पण...Facebook/ @amitabhbachchan

मुंबई: बॉलिवुडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस आहे. ११ ऑक्टोबर १९४२ साली त्यांचा जन्म झाला. शहंशाह, बिग-बी, महानायक अशा अनेक नावांनी आपण त्यांना ओळखतो. ज्या वयात ज्येष्ठ नागरिक पेंशन घेऊन आरामात जगायचं स्वप्न बघतात, त्याच वयात अमिताभ बच्चन हे प्रचंड व्यस्त आणि तगडी कमाई करणारे सुपर आणि सिनीअर स्टार आहेत. त्यांच्या अभिनयाने चाहते घायाळ तर होतातच, पण त्यांच्या भारदस्त आवाजानेही चाहते उत्साहीत होतात. (Birthday Special: Amitabh Bachchan's debut in 80th year)

हे देखील पहा -

अमिताभ बच्चन यांच्या वडिलांचे नावं डॉ. हरिवंश राय बच्चन आहे. जे एक प्रसिद्ध कवी होते आणि त्यांच्या आईचे नावं तेजी बच्चन होते. बिग बी यांना एकेकाळी इंजिनियर बनायचे होते. तसेच त्यांनी एयरफोर्समध्ये जाण्याचे देखील स्वप्नं पाहिले होते, मात्र त्यांच्या नाशिबत काहीतरी वेगळाचं लिहिले होते आणि त्यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय सिनेमातील एंग्री यंग मॅन अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली आणि चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या. अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले. चार राष्ट्रीय पुरस्कार आणि चौदा फिल्मफेअर पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे. त्याचप्रमाणे ते काही काळ राजकारणातही होते. १९८४ ते १९८७ या काळात ते लोकसभेसाठी निवडले गेले होते.

Birthday Special: अमिताभ बच्चन यांचं ८० व्या वर्षात पदार्पण...
महाराष्ट्र बंद : कल्याण-शिळ रोडवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला रस्ता रोखो...

सत्ते पे सत्ता, डॉन, महान, सुर्यवंशम, आखरी रास्ता, देश प्रेम, तूफान, खुदा गवाह त्यांची अशी अनेक चित्रपटं सुपरहीट ठरली. १९६९ साली त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरवात सात हिंदुस्तानी या चित्रपटापासून केली होती. बिग बी यांना त्या चित्रपटासाठी तेव्हा ५ हजार रुपये मानधन मिळाले होते. मात्र आज एका चित्रपटासाठी त्यांचे मानधन १५ ते २० कोटींच्या घरात आहे. त्यांची मुंबईत जलसा, जमक, प्रतिक्षा आणि वस्ता ही चार महागडे आणि आलिशान बंगले आहेत. याशिवाय अन्य प्रॉपर्टी देखील आहे. कौन बनेगा करोडपती आणि जाहिरातींमधूनही बिग बी तगडी कमाई करतात.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.