Adipurush Teaser: आदिपुरूष ट्रोलर्सच्या निशाण्यावर; रावणाच्या गावातून होतोय विरोध

रावणाविरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तींवर, सोबतच चित्रपटातील रावणाच्या लूकवर बंदी आणावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Adipurush Teaser
Adipurush TeaserSaam Tv

मुंबई: आदिपुरुष चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होऊन अवघे दोनच दिवस झाले असून टीझर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे (Bollywood). आदिपुरुष चित्रपटात सैफ अली खान (Saif Ali Khan) रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, सैफ अली खान रावण म्हणून लोकांना अजिबात आवडलेला नाही. सैफ अली खानच्या लूकवर प्रत्येकजण आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान, आता रावणाच्या बिसराख गावातूनही याविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. रावणाचे हे रूप दाखवून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे नोएडातील बिसरख गावातील लोकांचे म्हणणे आहे.

Adipurush Teaser
Adipurush teaser: प्रभासचा 'आदिपुरुष' करणार 'अधर्माचा नायनाट'; कलाकाराच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले...

एका वृत्तवाहिनीने रावणाचे जन्मस्थळ असलेल्या बिसराख गावात जाऊन गावकऱ्यांचे चित्रपटाबद्दल मत जाणून घेतले होते. गावकरी म्हणतात, रावण जरी खऱ्या आयुष्यात खलनायक असला तरी तो गावकऱ्यांसाठी नायक होता. त्याच्या वडिलांच्या नावावरुन गावाचे नाव पडले होते. त्या गावात रावणाच्या वडिलांचे मंदीर ही बांधण्यात आले होते. गावकऱ्यांनी रावणाविरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तींवर बंदी आणावी, अशी मागणी आहे. सोबतच चित्रपटातील रावणाचा लूक खूपच वेगळा आहे.

Adipurush Teaser
Swara Bhaskar: स्वरा भास्करचं राहुल गांधींसाठी खास ट्विट, पावसात भिजलेल्या राहुल गांधींचे केले कौतुक; म्हणाली...

चित्रपटातील व्हिएफएक्सच्या वापरामुळे चित्रपटाचा आवाका बदलतो. चित्रपटात व्हिएफएक्स वापरला जातो त्यावेळी चित्रपट पाहण्यात खूप बदल होतो. गावकऱ्यांनी रावणाच्या लुकवरील झालेल्या बदलावात चित्रपटात आक्षेप घेतला आहे. धर्मावरील काही आक्षेपार्ह आशय घेतल्याने गावकऱ्यांनी चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. रावणहा आसूरासोबतच एक देवभक्तही होता. रावण शिवभक्त असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे.

Adipurush Teaser
Web Series: ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री...

चित्रपटात प्रभासने रामाची भूमिका साकारली असून क्रिती सेनन सीतेची तर ज्या भूमिकेवरुन सर्वाधिक रणकंदन होत आहे ती भूमिका म्हणजे रावणाची. रावणाचे पात्र सैफ अली खानने साकारले आहे. तर लक्ष्मणाचे पात्र सनी सिंग साकारतोय. आगामी वर्षात १२ जानेवारी रोजी IMAX आणि 3D मध्ये चाहते चित्रपट पाहू शकणार आहेत. पौराणिक शैलीत असलेला चित्रपट हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषेत चित्रपट पाहता येणार आहे. टी-सीरीजने चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन भूषण कुमारांचे आहे. आता चाहते, समीक्षक आणि नेटकरी 'आदिपुरुष' चित्रपटाला पसंती देतात का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com