यशोमती ठाकूर यांनी पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हावं पण...; भाजपच्या महिला आमदाराचा सल्ला

यशोमती ठाकूर यांनी भविष्यात काय बनावे असा प्रश्न विचारला असता त्यावर श्वेता महाले म्हणाल्या...
Rupali Chakankar, Yashomati Thakur, Shweta Mahale
Rupali Chakankar, Yashomati Thakur, Shweta MahaleSaam TV

मुंबई: झी मराठी वाहिनीवरील किचन कलाकार कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि भाजप आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) उपस्थीत होत्या. या कार्यक्रमात अनेक राजकीय विषयांवर या महिला नेत्यांनी आपली मतं व्य्क्त केली आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजप आमदार श्वेता महाले यांना काही फोटो दाखवण्यात येत होते त्यावेळी त्यांना यशोमती ठाकूर यांचा फोटो दाखवण्यात आला.

यशोमती ठाकूर यांनी भविष्यात काय बनावे असा प्रश्न विचारला असता त्यावर श्वेता महाले म्हणाल्या त्यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनावं परंतु भाजपच्या तिकीटावर. एवढे बोलल्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला. यानंतर यशोमती ठाकूर काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यशोमती ठाकूर म्हणाल्या मुख्यमंत्री पद नाही मिळालं तरी चालेल परंतु विचारसरणी सोडणार नाही.

दरम्यान श्वेता महाले या सध्या बुलडाण्यातील चिखली विधानसभा मतदार संघातून आमदार आहेत. तर यशोमती ठाकूर या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मंत्री आहेत तसेच त्या अमरावतीच्या पालकमंत्री आहे. या दोन्ही नेत्या जरी वेगवेगळ्या पक्षात असल्या तरीही त्यांच्यातील मैत्री काय लपून राहिले नाहीये. या अगोदरही या कार्यक्रमात अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे. शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या अगोदर किचन कलाकार कार्यक्रमात आल्या असता त्यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com