
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट (movie) प्रदर्शित होत आहेत. डोंबिवली फास्ट, सैराट,बालकपालक, फँड्री असे अनेक चित्रपट समाजातील अवगुणांवर भाष्य करणारे होते . त्यातीलच एक चित्रपट म्हणजे 'टकाटक'. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामधील बोल्ड सीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 'टकाटक'ला मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे.
'टकाटक'या चित्रपटात तरुणाई कोणत्या चुका करतात यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.या चित्रपटात विनोदामार्फत समाजातील अवगुणांवर भाष्य केले आहे. या चित्रपटातील सर्व गाणी देखील मनोरंजनाने (Entertainment) भरलेल्या आहेत. या चित्रपटामध्ये तरुणाईला व सर्व वयोगटातील प्रेक्षकांना एक संदेश देण्यात आला आहे. याच तरुणाईच्या प्रश्नांवर आधारित आता 'टकाटक २' हा विनोदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
'टकाटक २' हा चित्रपट १९ ऑगस्ट २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये प्रथमेश परब मुख्य भूमिका साकारणार आहे तर अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे काळे, स्मिता डोंगरे या कलाकारांच्याही चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत.
'टकाटक २'ची निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.तर मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. आता बघूयात, 'टकाटक' प्रमाणे 'टाकाटक २' ला प्रेक्षक किती पसंद देणार.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.