Varun- Natasha: 'ही' बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी होणार आई- बाबा, सलमानने ऑन स्क्रिन दिले संकेत

वरूण आणि नताशाने २४ जानेवारी २०२२ रोजी अलिबागमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. लवकरच वरुण- नताशा आई बाबा होणार असल्याचे वृत्त खुद्द सलमान खानने दिले आहे.
Varun- Natasha Expacting Baby
Varun- Natasha Expacting BabySaam Tv

Varun- Natasha: २०२२ हे वर्ष मनोरंजन क्षेत्रासाठी खूपच स्पेशल ठरले आहे. या वर्षात अनेक बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित जोडप्यांचे लग्न पार पडले आहे. तर बऱ्याच कलाकारांच्या घरी बाळाचे आगमन झाले आहेत. प्रियंका- निक, सोनम- आनंद, भारती- हर्ष, बिपाशा- करण आणि आलिया- रणबीर या जोड्यांच्या घरी पाळणा हलला आहे. या यादीत आणखी एका जोडीचे नाव जोडले जाणार आहे. ती जोडी म्हणजे, वरुण धवन- नताशा दलाल. लवकरच वरुण- नताशा आई बाबा होणार असल्याचे वृत्त खुद्द सलमान खानने दिले आहे.

Varun- Natasha Expacting Baby
Sania Mirza- Shoaib Malik: सानिया-शोएबची जोडी एकत्र स्क्रिन शेअर करणार, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

वरुण धवन आणि क्रिती सेनन आपला आगामी चित्रपट 'भेडिया'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. दोघांनी बिग बॉस 16 च्या सेटवर चित्रपटाचे प्रमोशन देखील केले. तेथे वरुण आणि क्रितीने सलमान खानसोबत काही मजेदार खेळही खेळले.

सोबतच सर्व स्पर्धकांशी संवादही साधला. सोबतच सर्वांचेच लक्ष वेधून घेतले ते एका टॉय गिफ्टने. सलमानने वरुण धवनला बिग बॉसच्या घरात एक सॉफ्ट टॉय भेट म्हणून दिली. खरंतर हे गिफ्ट येणाऱ्या छोट्या बाळासाठी होतं.

वरुण धवन आणि क्रिती सेननसोबतच्या मजेशीर भागानंतर, सलमान खानने वरुण धवनला एक सॉफ्ट टॉय दिले. वरुणने विचारले की त्याचे काय करणार, त्यावर सलमानने लगेच उत्तर दिले, "हे तुमच्या मुलासाठी आहे" यामुळे वरुण लाजला आणि तो म्हणाला, "मला अजून मूल नाही."

यावर सलमानने विनोद केला की, "खेळणं आलंय, मूलही लवकरच येईल." सलमान खानच्या या इशाऱ्यावरून वरुण आणि नताशा लवकरच आई-बाबा होणार असल्याचं दिसतंय. पण अजून तरी वरुणने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

Varun- Natasha Expacting Baby
Kangana Ranaut: कंगना रणौतने इनस्टाग्रामबाबत केलं खळबळजनक वक्तव्य; म्हणाली, 'मुर्ख...'

वरुण आणि नताशा २४ जानेवारी २०२२ रोजी अलिबागमध्ये जवळच्या नातेवाईकांसोबत आणि मित्रपरिवारांसोबत लग्नबंधनात अडकले होते. याआधी एकदा नाही दोनदा नताशा प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगली होती. पण त्यावेळी नताशाने अफवा असल्याचे सांगत त्या चर्चांवर पांघरुन टाकले. यावेळी सलमानजे बोलला आहे, ते खरोखर ठरतं का हे जाणण्यासाठी दोघांचेही चाहते आतुर झाले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com