
Amir Khan Nickname: बॉलिवूडमध्ये 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून आमिर खानची ओळख आहे. आमिरला अभिनयाची फार गोडी आहे. जो पर्यंत मनाला समाधान वाटत नाही, तो पर्यंत प्रयत्न करतो. त्यामुळेच आमिरची फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, भारतीय सिनेसृष्टीत 'मिस्टर परफेक्शनिस्ट' नावाने ओळख आहे. त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप झाल्याने आमिरने सध्या अभिनयातून ब्रेक घेतला आहे. आजकाल आपल्या कुटुंबासाठी आणि काही खास व्यक्तींना तो सर्वाधिक वेळ देत आहे. आज आमिरचा वाढदिवस आहे. चला तर त्याच्या आयुष्यावर थोडक्यात नजर टाकुया.
आमिर खानचा जन्म 14 मार्च 1965 रोजी मुंबईत झाला. त्याचे पूर्ण नाव मोहम्मद आमीर हुसैन खान आहे. आमिरचे वडील ताहिर हुसैन हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. ज्या काळात ताहिरचे चित्रपट पडद्यावर अपयशी ठरत होते, त्यावेळी आमिरने फिल्मी दुनियेत पाऊल टाकावे असे त्याला वाटत नव्हते. पण आमिरला सुरुवातीपासूनच अभिनयाची फार आवड होती. त्यामुळेच त्याने आपले शिक्षणही पूर्ण न करत सिनेसृष्टीत पदार्पण केले. आमिरचे काही लघुपट असले तरी 'कयामत से कयामत तक' हा त्याचा पहिलाच चित्रपट होता, जो प्रचंड गाजला.
आमिर खानची आई त्याला लहानपणी 'कृष्णा' या टोपण नावाने हाक मारायची. यामागे दोन कारणे होती, पहिले म्हणजे त्याला लोणी खायची खूप आवड होते आणि दुसरे म्हणजे शाळेत असताना त्याला मुलींनी घेरले होते. आमिरबद्दल असं म्हटलं जातं की तो खूप भावूक आहे. आणि आपल्या मनातील खदखद समोरच्या व्यक्तीसमोर पटकन बोलून टाकतो. आमिरने एका मुलाखतीत सांगितले होते की, वयाच्या १७ व्या वर्षी त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला लव्ह लाईफमध्ये धोका दिला होता. म्हणून त्याने टक्कल केलं.
आमिरने 1986 मध्ये रीना दत्ताशी लग्न केले होते. तेव्हा आमिर 21 वर्षांचा होता आणि रीना 18 वर्षांची. त्या दोघांचंही प्रेम खूप आधीपासून होते. आमिर आणि रीना एकमेकांच्या बाजुलाच राहायला होते, त्याच दरम्यान आमिर रीनाच्या प्रेमात पडला. सुरुवातीला आमिरने तिला एकदा स्वतःच्या रक्ताने लिहिलेले पत्र पाठवले होते. आमिरने त्याच्या एका मुलाखतीत जेव्हा हा किस्सा सांगितला तेव्हा तो म्हणतो, 'हे बालिश किंवा भोळेपणाचे लक्षणं आहे.'असं करणं चुकीचं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.