
Aamir Khan: बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट ॲक्टर म्हणून आमिर खानची ओळख सर्वत्र आहे. आज आमिर आपला ५८ वा वाढदिवस साजरा करतोय. १९७३ मध्ये आलेल्या ‘यादों की बारात’ या चित्रपटापासून सुरू झालेली आमिर खानची सिनेकारकिर्द आजही मोठ्या दिमाखात आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत हिट चित्रपटांचा ‘मेळा’ लावणारा आमिर कधी 'राजा हिंदुस्तानी' तर कधी ‘गजनी’ झाला.
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने त्याने सर्वांना आपल्या अभिनयाचा ‘गुलाम’ बनवलं, आमिरचे हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान ‘कयामत से कयामत तक’ च्या माध्यमातून कायमच लक्षात राहिल.
आमिरचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘लाल सिंह चढ्ढा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. जरीही असे असले तरी, त्याच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसला नव संजीवनी दिली होती. आज संपूर्ण देशात आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट या नावाने ओळखले जात असले, तरी त्याची सिनेकारकीर्द संघर्ष, वाद आणि अनेक चढउतारांची होती.
१९८३ मध्ये एका मुलीने त्याला प्रेमात धोका दिला होता, त्यामुळे त्याने रागाच्या भरात टक्कल केलं होतं. आमिरने एका चित्रपटासाठी परफेक्टसाठी तब्बल १२ दिवस अंघोळ केली नव्हती.
आमिरच्या आयुष्यात दोन विवाह झाले होते. पहिले रीना दत्तासोबत तर, दुसरे लग्न किरण रावशी झाले होते. आमिरचे दोन्हीही लग्न १६ वर्षच टिकले. एकदा आमिरला जीवे मारण्याची धमकीही मिळाली होती.
तेव्हाच, जी व्यक्ती आमिरच्या कानाखाली देईल त्याला तब्बल एक कोटींचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. त्याच्या आयुष्यातील वादांचा परिणाम सिनेकारकिर्दीवर कधीच पडला नाही. आमिरच्या 40 वर्षांच्या सिनेकारकिर्दीत त्याने अनेक चित्रपट बॉलिवूडला दिले. आपल्या परिवाराला वेळ देण्यासाठी आमिरने सिनेकारकिर्देपासून ब्रेक घेतला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.