
Abhishek Bachchan Birthday: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चित सेलिब्रेटी कपल म्हणून ओळखले जाते. त्यांच्या लवस्टोरीची सिने जगतात नेहमीच चर्चा होताना दिसत असते. अभिषेक आणि ऐश्वर्याने २००७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. बॉलिवूडमधील सर्वात महागडा विवाह सोहळा म्हणून त्यांच्या लग्नाची चर्चा होत असते.
पण खूप कमी जणांना अभिषेक बच्चनच्या प्रेमप्रकरणांबद्दल माहित आहे, ज्यामधील एका अभिनेत्रीशी त्याचे लग्नही होणार होते. मात्र ऐनवेळी हे लग्न होऊ शकले नाही, काय आहे अभिषेक बच्चनची ही लवस्टोरी, चला जाणून घेवू.
अभिषेक बच्चन हा हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या अनेक दमदार भूमिकांनी अभिषेकने बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. आज (५, फेब्रूवारी) अभिनेता अभिषेक बच्चनचा वाढदिवस..
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांची जोडीही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. मात्र ऐश्वर्याच्या आधी अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत अभिषेक बच्चनचे लग्न होणार होते.
आईमुळे मोडले लग्न..
अभिषेक बच्चनचे नाव बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत जोडले गेले होते. असे म्हटले जाते की दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. एवढेच नाही तर दोघांची एंगेजमेंटही झाली होती.
मात्र, एंगेजमेंटनंतरही त्यांचे लग्न होऊ शकले नाही. असे म्हटले जाते की, करिश्मा कपूरची आई बबिता यांना हे नाते मान्य नव्हते, कारण त्यावेळी अभिषेकने नुकतेच त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. तर करिश्माने अनेक हिट चित्रपट दिले होते. त्यामुळे त्यांनी या लग्नाला नकार दिला.
रानी मुखर्जीसोबतही होत्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा...
अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीने 'बंटी और बबली' आणि 'युवा' सारख्या चित्रपटात एकत्र काम केले होते. आणि त्यानंतर त्यांच्या अफेअरचीही चर्चा सुरू झाली. त्या दिवसांमध्ये दोघे लग्न करणार असल्याची चर्चा होती. असे म्हटले जाते की, अभिषेक बच्चनची आई जया बच्चन यांनाही राणीची खूप आवड होती.
2005 साली आलेल्या 'ब्लॅक' चित्रपटात राणीचा अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्यासोबत एक किसिंग सीन होता आणि जया बच्चन यांना राणीने हा सीन करू नये असे वाटत होते, पण राणीने तो सीन केला होता. त्यामुळे राणी आणि अभिषेक एकत्र येऊ शकले नाहीत, असे सांगितले जाते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.