Drishyam 2 Box Office Collection: 'दृश्यम २' च्या घवघवीत यशानंतर अजयने चाहत्यांना दिली 'गुड न्यूज', VIDEO केला शेअर

'दृश्यम 2'च्या जबरदस्त कथेनंतर अजय देवगणने त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे.
Ajay Devgan and Tabu will be seen together in the upcoming movie again
Ajay Devgan and Tabu will be seen together in the upcoming movie againSaam Tv

Ajay Devgan Upcoming Movie: बॉलिवूड स्टार अजय देवगण सध्या 'दृश्यम 2' या त्याच्या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने 60 कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटची कमाई ज्या वेगाने होता त्यानुसार लवकरच चित्रपट सुपरहिट होईल यात शंका नाही. दृश्यम 2 च्या जबरदस्त कथेनंतर अजय देवगणने त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे.

अजय त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक भेट घेऊन आला आहे. अजय आणखी एका साऊथ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. अजय देवगणचा 'भोला' हा आगामी चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. त्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे. तसेच या चित्रपटाचा टीझर मंगळवारी 22 नोव्हेंबर रोजी शेअर केला जाणार आहे.

Ajay Devgan and Tabu will be seen together in the upcoming movie again
Shahrukh Khan: किंग खान 'डंकी'च्या शुटिंगसाठी जेद्दाहमध्ये, यादरम्यान चाहत्यासोबत शेअर केला खास व्हिडिओ

अजय देवगण आणि तब्बू यांनी 'दृश्यम' आणि त्याच्या सिक्वेलमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांचा हा 8 वा चित्रपट आहे. 8 चित्रपटांतून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवल्यानंतर हे दोन्ही प्रतिभावान कलाकार भोला या चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु 2023 च्या सुरुवातीला हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होऊ शकतो. 'भोला'चे शूटिंग ऑगस्टमध्ये पूर्ण झाले. आता अभिनेत्याने चित्रपटाचा एक छोटा व्हिडिओ शेअर करून टीझरची घोषणा केली आहे. हा चित्रपट 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अजय देवगणने दिग्दर्शित केला आहे. (Ajay Devgan)

'दृश्यम 2' ला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटाने बॉलिवूड चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांमध्ये आणले आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.38 कोटी, दुसऱ्या दिवशी 21.59 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 27.17 कोटींची कमाई केली. या चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन 64.14 कोटी रुपये आहे. एका आठवड्यात चित्रपटाचे एकूण कलेक्शन 100 कोटींच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता आहे. (Bollywood)

'दृश्यम 2' चित्रपटाचे बजेट 50 कोटी आहे. तीन दिवसांत चित्रपटाने एकूण खर्चापेक्षा जास्त कमाई केली आहे. त्याचबरोबर आगामी काळात चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. (Movie)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com