Akshay Kumar: 'तुझे कितीही चित्रपट फ्लॉप होऊदे पण...', अक्षयला वडिलांनी दिलेला हा मोलाचा सल्ला

गेल्या वर्षी त्याचे जवळपास सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. पण तरीही त्याने आपल्या मानधनात कोणतीच कपात केली नाही.
Akshay Kumar
Akshay Kumar Saam TV

Akshay Kumar: सध्या बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार त्याच्या 'सेल्फी' या चित्रपटामुळे बराच चर्चेत आला आहे. नुकताच त्याने दीड मिनिटात चाहत्यांसोबत अनेक सेल्फी काढत वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे. गेल्या वर्षी त्याचे जवळपास सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. पण तरीही त्याने आपल्या मानधनात कोणतीच कपात केली नाही. सोबतच तो सर्वाधिक टॅक्स भरणारा अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. नुकताच त्याने सर्वाधिक टॅक्स वर भाष्य केले आहे.

Akshay Kumar
Javed Akhtar: 'इथे नाही घाबरत तर त्यांच्या देशात...' जावेद अख्तरांनी पाकिस्तानातील 'त्या' विधानावरुन सोडले मौन

अक्षयचा २०२३ मधला ' सेल्फी ' चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये तो बराच व्यग्र आहे. त्याचे अनेक प्रमोशनमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. नुकताच त्याने एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. त्यात त्याने त्याच्या अनेक आर्थिक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. 'जेव्हा आपण कर भरतो तेव्हाच आपल्या सोबत सर्व बोलतात. मी कर भरतो तर माझ्या मनाला समाधान मिळते.'

Akshay Kumar
HCA Films Awards 2023: दाक्षिणात्य चित्रपटाचा हॉलिवूडमध्ये डंका, RRR ने एक नाही थेट ४ पुरस्कार कमावले

सोबतच तो पुढे म्हणतो, 'मला चांगलं वाटतं जेव्हा एका अकाउंटंटचा मुलगा बरोबर कर भरतो. माझे वडील मला सांगून गेले आहेत बाळा तू तुझा कर बरोबर भरत जा. मला हे नकोय, की घरी कोणीतरी येईल आणि म्हणेल माल कुठे लपवून ठेवला आहे?' असे म्हणत त्याने आपले आणि वडीलांमधील संभाषण सांगितले.

Akshay Kumar
Tiger 3: 'चिंगम नहीं पेनकिलर...', बॉलिवूडचे 'करण अर्जुन' पुन्हा एकत्र येत करणार नव्या चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा

सोबतच अक्षय कॅनडाचा देखील नागरिक आहे. त्याच्या अनेक चित्रपटांना त्याचा फटका देखील बसला आहे. यावेळी त्याने या प्रकरणावर ही भाष्य केले. '९० च्या दशकात ही माझे चित्रपट चालत नसल्याने मी कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. मात्र त्या दरम्यानच्या काळातील २ चित्रपट सुपरहिट ठरले आणि भारतातच थांबण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.'

येत्या २४ फेब्रुवारीला अक्षयचा 'सेल्फी' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याच्या सोबत चित्रपटात इमरान हाश्मी, नुशरत भरूचा, डायना पेंटी या अभिनेत्रीसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सोबतच अक्षय या चित्रपटाव्यतिरिक्त ‘हेराफेरी ३’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ मध्ये ही झळकणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com