
मोदी सरकारविरोधात (Modi Government) देशभरातील वेगवेगळे पक्ष एकत्र आले आहेत. या सर्वांनी आपल्या आघाडीचे नाव 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुझिव्ह अलायन्स' म्हणजेच 'INDIA' असे ठेवले आहे. विरोधकांनी इंडियावरून ठेवलेल्या नावावरून सध्या जोरदार वाद सुरू आहे. या वादादरम्यान अमिताभ बच्चन यांचे ट्वीट चर्चेत आले आहे. या ट्वीटमुळे सर्वांना धक्का बसला आहे.
कधी काळी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे आणि दिवंगत राजीव गांधी यांचे खूपच जवळचे मित्र राहिलेल्या अमिताभ बच्चन यांच्या ट्विटमुळे सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अमिताभ बच्चन यांचे हे ट्वीट सामान्य आणि एका भारतीयासाठी गर्वाची गोष्ट आहे. पण हे ट्वीट करण्याचा टाईमिंग असा आहे की ज्यामुळे लोकं त्याचा चुकीचा अर्थ काढत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी केलेल्या ताज्या ट्विटमध्ये "T 4759 - भारत माता की जय" असे लिहिले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी तिरंगा आणि लाल ध्वजाचे इमोजीही शेअर केले आहेत. 'भारत माता की जय'च्या घोषणेला विरोध केल्यामुळे काँग्रेस वादात सापडली असताना त्यांचे हे ट्वीट आले आहे. खरं तर, जयपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान काँग्रेसच्या पर्यवेक्षक अनुराधा मिश्रा यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना 'भारत माता की जय'च्या घोषणा देण्यापासून रोखले आणि त्यांना काँग्रेस जिंदाबाद म्हणण्याचा सल्ला दिला. यावरून काँग्रेसवर टीका केली जात आहे. अशामध्ये बीग बींनी केलेले हे ट्वीट म्हणजे काँग्रेसला प्रत्युत्तर असल्याचे म्हटले जात आहे.
सध्या अमिताभ बच्चन यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्विटला अवघ्या काही मिनिटांतच 14 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर अडीच हजारांपेक्षा अधिक जणांनी हे ट्वीट रिट्विट केले आहे. तर एक हजारांपेक्षा अधिक जणांनी या ट्विटवर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी या ट्विटमध्ये इतर कशाचाच उल्लेख केला नाही. त्यामुळे युजर्स त्यांच्या या ट्विटचा थेट संबंध इंडिया या शब्दाशी लावत आहेत.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ‘उंचाई’ या चित्रपटामध्ये ते शेवटचे दिसले होते. याआधी ते अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत 'गुडबाय' आणि रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत 'ब्रह्मास्त्र पार्ट 1' या चित्रपटात दिसले होते. येत्या काही दिवसांमध्ये ते अनेक चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'कल्की 2898 एडी' यासारख्या बिग बजेट चित्रपटांमध्ये ते दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत प्रभास आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असणार आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.