Kaun Banega Crorepati: बिग बींचे प्रेम मराठी मुलीवर, अमिताभ यांनीच केला प्रेमाचा खुलासा...

'कौन बनेगा करोडपती'च्या नुकताच प्रदर्शित झालेल्या भागात अमिताभ यांनी त्यांच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला आहे.
Kaun Banega Crorepati
Kaun Banega Crorepati Saam Tv

Kaun Banega Crorepati In Amitabh Bachchan: बिग बी अमिताभ नेहमीच नेटकऱ्यांच्या चर्चेत असतात. कधी चित्रपटातील कामगिरीबद्दल तर कधी त्यांच्या खासगी गोष्टीबद्दल ही ते चर्चेत असतात. बिग बी आणि बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांची प्रेम कहाणी जग जाहीर आहे. अमित बच्चन 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहेत.

Kaun Banega Crorepati
Deepika Padukone: दीपिकाला ब्युटी प्रॉडक्ट्सची जाहिरात करणे पडले महागात, नेटकरी म्हणतात, 'हे तर किराण्यापेक्षा... '

सध्या 'कौन बनेगा करोडपती'चा १४ वा सीझन सुरु आहे. अमिताभ बच्चन नेहमीच कार्यक्रमात येणाऱ्या स्पर्धकांसोबत दिलखुलास गप्पा मारत असतात. त्यांच्या दिलखुलास गप्पा बऱ्याचदा खासगी आयुष्यापर्यंत ही जातात. यावेळी बिग बी आपल्या खासगी आयुष्यातील काही खुलासे ही प्रेक्षकांच्या समोर करत असतात.

बिग बींनी हा खुलासा नुकताच प्रदर्शित झालेल्या एका भागात केला होता. मध्यप्रदेशच्या भूपेंद्र चौधरी स्पर्धकाने धमाल, मस्ती करत अमिताभ बच्चन यांच्याबरोबर हा खेळ खेळत प्रेक्षकांचेही मनोरंजन केले. त्यांचा उत्साह पाहताच बिग बीदेखील हैराण झाले. या भागात त्या स्पर्धकाने अमिताभ यांना त्यांच्या खासगी आयुष्यातील काही प्रश्न विचारले.

Kaun Banega Crorepati
Saif Ali Khan: सैफने पतौडीचे दर्शन घडवले, चाहत्यांना सांगतो, 'प्रत्येक खोलीत माझे...'

भूपेंद्रला शाळेतील त्याच्या मैत्रिणी 'शाहरुख खान' म्हणायच्या असे सांगितले. नंतर त्या स्पर्धकाने बच्चन यांना सुद्धा प्रश्न केला की, त्यांच्या वर्गमैत्रिणी त्यांना कोणत्या नावाने हाक मारायच्या? यावर बिग बी मस्करीत उत्तर देत म्हणाले, माझ्या वर्गमैत्रिणी मला उंट म्हणायच्या. अशा बऱ्याच आठवणींना बच्चन यांनी उजाळा दिला आहे. त्यांच्या अशा काही रंजक व्हिडिओ सोशल मीडियावर बरेच चर्चेत असतात.

काही दिवसांपुर्वी बच्चन यांचा पहिल्या प्रेमाचाही खुलासा करण्यात आला होता. अमिताभ आणि रेखा यांच्यातील नातेसंबंध सगळ्यांनाच ठाऊक आहेत, पण त्यांच्या प्रेमात पुढे काही न झाल्याने अमिताभ यांनी जया बच्चन यांच्याशी विवाह केला. पण या दोघींच्याही आधी बच्चन यांच्या प्रेमात एक महाराष्ट्रीयन, मराठमोळी मुलगी होती.

Kaun Banega Crorepati
Punjabi Actress Daljeet Kaur : पंजाबी चित्रपटसृष्टीतील 'हेमा मालिनी'चे झाले दीर्घ आजाराने निधन

अमिताभ यांचे खास मित्र दिनेश कुमार यांनी मध्यंतरी या गोष्टीचा खुलासा केला होता. बच्चन जेव्हा कलकत्तामध्ये होते तेव्हाचा हा किस्सा आहे. अमिताभ ज्या कंपनीत कामाला होते, तिथे त्यांची एका मराठी मुलीशी ओळख झाली होती. तिचे नाव चंदा होते. अमिताभ आणि त्यांचं तब्बल ३ वर्षं नातं टिकलं होतं. अमिताभ यांना तिच्याशी लग्नदेखील करायचं होतं.

नंतर अभिनयाच्या प्रेमापोटी अमिताभ कलकत्ता सोडून मुंबईत आले आणि त्यांची ही प्रेमकहाणी अधुरीच राहिली. नंतर त्या मुलीने एका प्रसिद्ध बंगाली अभिनेत्याशी लग्न केले. अमिताभ बच्चन यांचा ‘उंचाई’ हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय आणि ‘केबीसी’च्या माध्यमातूनही ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com