Satish Kaushik Death: बॉलिवूडवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन

Bollywood News: सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे.
Satish Kaushik
Satish Kaushik Facebook

Satish Kaushik Death: प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सतीश कौशिक यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. (Latest News Update)

Satish Kaushik
Ranbir Kapoor Interview: आमच्या पोटावर लाथ मारू नका..., बॉयकॉट बॉलिवूडवर रणबीर कपूरने दिली प्रतिक्रिया

अनुपम खेर यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, मला माहित आहे "मृत्यू हे जगाचे अंतिम सत्य आहे!" पण मी माझ्या जिवलग मित्र सतिश कौशिकबद्दल हे लिहीन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. ४५ वर्षांच्या मैत्रीचा असा अचानक अंत झाला. सतीश तुझ्याशिवाय आयुष्य आहे तसंच नाही राहणार. ओम शांती!

Satish Kaushik
Tu Jhoothi Main Makkar: 'तू झूठी मैं मक्कार' चित्रपटाला झटका; रणबीर-श्रद्धाचा चित्रपट प्रदर्शित होताच झाला लीक

सतीश कौशिक यांचं पार्थिव सध्या गुडगाव येथील फोर्टिस रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. शवविच्छेदनानंतर आज दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईतील त्यांच्या घरी आणण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सतीश कौशिक हे गुडगाव येथे जवळील व्यक्तीस भेटण्यासाठी गेले होते. तेथील फार्महाऊसवरून परतत असताना सतीश कौशिक यांना कारमध्येच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, अशी माहिती समोर येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com