Anil Kapoor Love Story: अनिल कपूरची गर्लफ्रेंड करायची त्याचा खर्च, ५० वर्षानंतर आजही...

अनिल कपूरच्या स्ट्रगलदरम्यान गर्लफ्रेंड करायची त्यांना आर्थिक मदत.
Anil Kapoor Birthday
Anil Kapoor BirthdayInstagram @anilskapoor

Anil Kapoor Girlfriend: बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांचा आज ६६ वा वाढदिवस आहे. अनिल कपूर यांच जन्म २४ डिसेंबर, १९५६ साली मुंबईमध्ये झाला. अनिल बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेते आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या जीवनाशी निगडित काही गोष्टी.

अनिल कपूर यांनी १९८३ साली 'वो सात दिन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटामध्ये पद्मिनी कोल्हापुरे त्यांची हिरोईन होती. दोघांच्या जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. असे असले तरी अनिल कपूर यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार आधीच निवडला होता. अनिल कपूर जेव्हा स्ट्रगल करत होते तेव्हा त्यांची गर्लफ्रेंड सुनीता त्यांना आर्थिक सहकार्य करायची. (Bollywood)

Anil Kapoor Birthday
Anil Kapoor's Birthday: सोनमनं वडिलांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, नातवासोबतच्या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले

अनिल कपूर आणि सुनीता यांची लव्ह स्टोरी खूपच रंजक आहे. अनिल त्यांच्या स्ट्रगल दरम्यान सुनीता यांच्या प्रेमात पडले होते. अनिल यांची परिस्थिती माहित असतानाही सुनीताने त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. अनिल यांची आर्थिक स्थिती माहित असल्यामुळे सुनीता त्यांना बऱ्याचदा आर्थिक मदत करायची. सुनीता बॉयफ्रेंड अनिल यांना अनेकदा फिल्म स्टुडिओला जाण्यासाठी लागणारे टॅक्सीचे पैसे द्यायची.

अनिल कपूर चित्रपटामध्ये काम मिळविण्यासाठी धडपड करत होते. तर सुनीताने मॉडेलिंग क्षेत्रात स्वतः ओळख निर्माण केली होती. अनिल कपूर यांना भेटल्यानंतर सुनीताने त्यांना स्वतःचा फोने नंबर देखील दिला होता. कामासंदर्भात एकमेकांशी बोलता बोलता दोघे एकमेकांना आवडू लागले. (Movie)

अनिल कपूर यांना 'वो सात दिन' चित्रपट मुख्य भूमिकेसाठी ऑफर करण्यात आला होता. हा चित्रपट त्यावर्षीचा सगळयात हिट चित्रपट ठरला. चित्रपट हिट झाल्यानंतर देखील अनिल कपूर यांचा स्ट्रगल संपला नव्हता. त्याआधी उमेश मेहरा यांचा 'हमारे तुम्हारे' या त्यांचा पहिला चित्रपट होता.

अनिल कपूर यांचा 'मशाल' हा चित्रपट १९८४ साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अनिल कपूर यांनी गर्लफ्रेंड सुनीताशी लग्न करण्याचा विचार पाक केला होता. सुभाष घाई यांचा 'जंग' चित्रपट साइन केल्यानंतर अनिल यांनी सुनीताशी लग्न केले.

अनिल कपूरच्या स्ट्रगलच्या काळातील एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे. चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी स्ट्रगल करत असताना अनिल कपूर राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहायचे. चित्रपट मिळाल्यानंतर मिस्टर इंडियाने मुंबईतील एका चाळीत भाड्याने घर घेतले होते. त्यानंतर त्यांचे आयुष्य असे बदलले की आज अनिल कपूर यांचे मुंबईत करोडोचे तीन बंगले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com