Annu Kapoor: बँक कर्मचारी मालामाल; कलाकार 'सायबर फ्रॉड' चा शिकार

नुकताच केवायसीच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीमुळे अन्नू कपूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Annu Kapoor Online Fraud
Annu Kapoor Online Fraud Instagram/ @annukapoor

मुंबई: अन्नू कपूर हा बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट (Bollywood Actor) अभिनेत्यांपैकी एक आहे, जो पडद्यावर आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांचे मनोरंजन करण्यासाठी ओळखला जातो. नुकताच त्याच्यासोबत झालेल्या एका फसवणुकीमुळे तो चर्चेत आला. अलीकडे केवायसीच्या (KYC) नावाखाली कलाकार फसवणुकीचे (Online Fraud) बळी ठरले आहेत.

Annu Kapoor Online Fraud
Actress Kidney Fail: अभिनेत्रीवर अत्यंत वाईट वेळ, दोन्ही किडन्या फेल.. आता उपचारासाठी पैसेही नाहीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी अन्नू कपूर (Annu Kapoor) शूटिंगसाठी निघण्याच्या तयारीत असताना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःचे नाव कृष्णकुमार रेड्डी असल्याचे सांगितले आणि ते एका खाजगी बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. ज्या व्यक्तीचे खाते आहे त्यासोबतच बोलावे लागेल कारण केवायसी संबंधीत चौकशी करायचे आहे सांगत भामट्याने अन्नू कपूर यांच्या खात्यातून ४. ३६ लाखांची रक्कम दुसऱ्या खात्यात वळती केली. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे अन्नू कपूर यांना एकूण रकमेतून 3.8 लाख रुपये परत मिळणार आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे.

Annu Kapoor Online Fraud
Alia Bhatt: आलिया भटने लाँच केला मॅटर्निटी वेअर ब्रँड, तणावमुक्त राहण्यासाठी तयार केले बंप-फ्रेंडली कपडे

मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात अन्नू कपूरेने ऑनलाईन फ्रॉड सबंधित तक्रार नोंदवली आहे. पोलिस अधिकाऱ्याने या संदर्भात माहिती दिली की, गुरुवारी एका व्यक्तीने कपूरला फोन केला आणि त्याने अन्नू कपूर यांना सांगितले की, त्यांचे केवायसी (नो युवर कस्टमर)ची माहिती अपडेट करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याने अन्नू कपूर यांना त्यांचे बँक खात्याची माहिती सोबतच वन टाईम पासवर्ड (OTP) विचारला. ओटीपी सांगताच अन्नूचे बॅंक खाते पूर्ण खाली झाले.

बॅंक कर्मचारी असल्याचे सांगत अन्नू कपूर यांना फोनवर माहिती दिली. तो अन्नू कपूरला फोनवर सांगतो, तुमच्या अकाऊंटवर तात्काळ केवायसी अपडेट करायचा आहे. अन्नू कपूरने त्याच्यावर विश्वास ठेवत, आपले बँक तपशील आणि वन टाईम पासवर्ड त्या व्यक्तीसोबत शेअर केला. काही वेळातच अन्नू कपूरच्या खात्यातून भलत्याच दोन खात्यांमध्ये तब्बल 4.36 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. मात्र, बँकेने त्यांना तात्काळ फोन करून त्यांच्या खात्यावर इतके मोठे व्यवहार होत असल्याची माहिती दिली.

यानंतर अन्नू कपूरने लगेच पोलिस आणि बॅंकेसोबत संपर्क साधला, त्यानंतर ज्या खात्यांमध्ये त्यांचे पैसे गेले होते त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. अन्नू कपूर यांचे पैसे ज्या 2 खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते, ती दोन्ही खाती बँकेने तात्काळ फ्रीज केली असून, अन्नू कपूर यांना 3.08 लाख रुपये परत मिळणार आहेत, अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com