Koffee With Karan 7 : ईशान खट्टर सांगणार अनन्या पांडेसोबतच्या ब्रेकअपच कारण ?

दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण सीझन ७' ची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे.
Ishaan Khattar
Ishaan Khattar Saam Tv

मुंबई : दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण सीझन ७'(Koffee With Karan 7) ची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. या शोमध्ये आलेल्या सेलिब्रिटींनी या शोमध्ये सहभागी होऊन खूप आनंद लुटला आहे. त्याचप्रमाणे काही खळबळजनक खुलासे देखील केले आहेत. आता या शोच्या आगामी भागात बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर(ishaan khatter) सहभागी होणार आहे. खुद्द ईशानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

Ishaan Khattar
Allu Arjun : 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनचा जबरदस्त लूक आला समोर!

आत्तापर्यंत शोचे चार भाग प्रसारित झाले आहेत. गेल्या एपिसोडमध्ये ईशान खट्टरची एक्स गर्लफ्रेंड अनन्या पांडे साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत दिसली होती. आता या शोमध्ये ईशान खट्टर हजेरी लावणार आहे. यादरम्यान, तो त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी बोलणार असून, करणच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासोबतच अनेक मनोरंजक खुलासेही करणार आहे.

Ishaan Khattar
Aamir Khan: 'लाल सिंह चड्ढा'च्या बॉयकटमुळे आमिर खान झाला दु:खी, म्हणाला 'काही लोकांना वाटतं मला भारत...

ईशान खट्टरने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत 'कॉफी डेट विथ...' असे लिहून हॅशटॅमध्ये 'कॉफी विथ करण ७' असे नमूद केले आहे. फोटोमध्ये ईशानच्या लूकबद्दल बोलायचे तर तो व्हाइट जीन्स आणि प्रिंटेड व्हाइट शर्टमध्ये डॅशिंग क्यूट बॉय दिसत आहे.

ईशानच्या या कॅप्शनवरून असा अंदाज लावला जात आहे की, तो लवकरच कॉफी विथ करण ७ या शोचा भाग होणार आहे. मात्र, तो कोणासोबत या शोमध्ये सहभागी होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांची उत्कंठा नक्कीच वाढली आहे.

आगामी भाग खूप मजेदार असू शकतो कारण शेवटच्या एपिसोडमध्ये जेव्हा अभिनेत्री अनन्या पांडेचा या शोमध्ये आली होती, तेव्हा करणने तिला इशानसोबतच्या अफेअर आणि ब्रेकअपबद्दल विचारले. आता अशी अटकळ सुरू आहे की, करण जोहर शोमध्ये अनन्यानंतर ईशानला त्या दोघांच्या लव्ह लाईफ आणि अफेअरबद्दल प्रश्न विचारू शकतो.

ईशान खट्टर आणि अनन्या पांडे 'खली पीली' या सिनेमात एकत्र दिसले होते. या सिनेमाच्या शुटिंगदरम्यानच त्यांच्या अफेअरची अटकळ सुरू झाली होती. दोघेही त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कधीच काही बोलले नसले, तरी नंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समजले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com