
Satyaprem Ki Katha Movie: बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी (Actress Kiara Advani) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Actor Kartik Aryan) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सत्य प्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत दोघांचेही चाहते खूपच उत्सुक आहेत. अशामध्ये या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. रोमांस आणि ड्रामाने भरलेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. कियाराने या चित्रपटाचा टीझर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या टीझरमध्ये कार्तिक-कियाराची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट यावर्षी 29 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात कार्तिक आर्यनच्या दमदार डायलॉगने होते. हा टीझर पाहता ही एक हृदयस्पर्शी लव्हस्टोरी असल्याचे दिसत आहे. दोघांचाही या टीझरमध्ये जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले आहे. या चित्रपटात कार्तिक आणि कियारासोबत गजराज राव आणि सुप्रिया पाठकही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन दुसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याआधी कार्तिक आणि कियारा या जोडीने 'भूल भुलैया 2' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. आता त्यांचा 'सत्यप्रेम की कथा' हा नवा चित्रपट येणार असल्यामुळे सर्वजण खूपच आनंदीत आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर चाहत्यांना खूपच आवडला आहे. या टीझरवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, 'आता वाट पाहू शकत नाही'. तर दुसर्या यूजरने लिहिले की, 'या प्रेमकथेच्या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.'
या चित्रपटाच्या टीझरमध्ये दोघांची जोडी खूपच जबरदस्त दिसत आहे. या चित्रपटात दोघांची दमदार केमिस्ट्री सर्वांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टीझर पाहून त्यांचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक झाले आहेत. टीझर पाहून हा चित्रपट कार्तिक आणि कियाराच्या सॉफ्ट लव्हस्टोरीवर आधारित असल्याचे दिसून येत आहे. अशामध्ये या दोघांच्या या चित्रपटाकडून चाहते आणि निर्माते दोघांनाही खूप आशा आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.