Main Atal Hoon First Look: अटलजींच्या भूमिकेत 'हा' बॉलिवूड अभिनेता, हुबेहुब अटलजीच....

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक ख्यातनाम आणि दिग्गज मंडळींवर जीवनपटाचे काम सुरु आहे.
Main Atal Hoon
Main Atal HoonSaam Tv

Main Atal Hoon First Look: सध्या बॉलिवूडमध्ये अनेक ख्यातनाम आणि दिग्गज मंडळींवर जीवनपटाचे काम सुरु आहे. सध्या सर्वाधिक जीवनपट चर्चेचा विषय आहे तो म्हणजे, भारताचे माजी पंतप्रधान अटल वाजपेयी यांचा. आज २५ डिसेंबर भारताचे माजी पंतप्रधान, एक दमदार आणि उमदे व्यक्तिमत्व, कवी, संवेदनशील व्यक्तिमत्व आणि जगन्मित्र अशी अटल बिहारी वाजपेयी यांची जगभर असलेली ख्याती. लवकरच त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Main Atal Hoon
Video: रुपालीचे क्रिसमसनिमित्त केले चाहत्यांचे मनोरंजन, हूक स्टेप्सने सर्वांचेच लक्ष वेधले...

(Bollywood) सध्या या चित्रपटाची सर्वत्रच चर्चा सुरु आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांच्या खांद्यावर आहे. तर मुख्य भूमिकेत म्हणजे अटल बिहारींच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी दिसणार आहे. त्यांच्या जयंतीच्या औचित्यावर चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले आहे. सोबतच पंकज त्रिपाठीचा (Pankaj Tripathi) अटल बिहारींच्या भूमिकेतील पहिला लूकही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Main Atal Hoon
Chalapathi Rao: तेलुगू अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या ७८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

काल शनिवारी 24 डिसेंबर रोजी पंकज त्रिपाठीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून 'मै अटल हूं..' या बायोपिकचं नाव जाहीर केले होते (Atal Bihari Vajpayee) . आज अटलजींच्या जयंती निमित्त दिग्दर्शक रवी जाधव आणि पंकज त्रिपाठीने एक छोटा टीझर आऊट केला आहे. (Social Media) ज्यामध्ये अटलजींचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडिओत अटल बिहारी वाजपेयी यांचे विविध रुप पंकजच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहेत.

" 'अटल' जींचे व्यक्तित्व पडद्यावर साकारण्यासाठी यांच्या व्यक्तिमत्वाच्या अभ्यासाची फारच गरज आहे. याची मला जाणीव आहे. परंतु स्फूर्ती आणि मनोबल याच्या जोरावर मी या भूमिकेला न्याय देऊ शकेन असा मला अटल विश्वास आहे.." अशी पोस्ट त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहिली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी दिग्दर्शक रवी जाधव करत आहे, तर अटलजींच्या प्रमुख भूमिकेत पंकज त्रिपाठी आहेत. चित्रपटाची कथा 'द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिक्स अँड पॅराडॉक्स' या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपट येत्या आगामी वर्षात २५ डिसेंबर रोजी त्यांच्या जयंती निमित्त प्रदर्शित होणार आहे. (Bollywood New Films)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com