Ranbir Kapoor Interview: आमच्या पोटावर लाथ मारू नका..., बॉयकॉट बॉलिवूडवर रणबीर कपूरने दिली प्रतिक्रिया

'तू झुटी मैं मक्कार'च्या प्रमोशन दरम्यान रणबीर कपूरने बॉयकॉट बॉलिवूडवर त्याचे मत व्यक्त केले आहे.
Ranbir Kapoor On Boycott Bollywood
Ranbir Kapoor On Boycott BollywoodSaam Tv

Ranbir Kapoor On Boycott Bollywood: रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाला चांगले यश मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई देखील आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या यशाचा आनंद उपभोगल्यानंतर रणबीर कपूर आता नवीन चित्रपटसह सज्ज झाला आहे.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत लव रंजन दिग्दर्शित 'तू झुटी मैं मक्कार' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आज म्हणजे, 8 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. रणबीरने या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना अलीकडेच #BoycottBollywood आणि इंडस्ट्रीची साउथ फिल्म इंडस्ट्रीशी केली जाणारी तुलना याबद्दल मत व्यक्त केले आहे.

रणबीर म्हणतो की, सगळेजण बॉलिवूड विरोधी आहेत असे नाही, काही लोक आहेत ज्यांनी कोविड -19 नंतर अशा पोस्ट करण्यास सुरुवात केली होती, जे अद्याप सुरू आहे.

Ranbir Kapoor On Boycott Bollywood
International Women's Day: बॉलिवूडमधील 'या' ५ महिलांनी सिनेसृष्टीचा चेहराच बदलला

रणबीरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, अनेक मुलाखतींमध्ये #BoycottBollywood बद्दल विचारले गेले. त्याला अनेक गोष्टी सांगायच्या असतात, पण तो जेव्हा त्याचे मत व्यक्त करतो तेव्हा त्यांच्या चुकीचा अर्थ काढून गैरसमज निर्माण होतात. हिंदी विरुद्ध दक्षिण वादावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की त्यांना दाक्षिणात्य चित्रपटांचा खूप अभिमान आहे.

रणबीर कपूर म्हणाला, “हिंदी चित्रपटसृष्टीला KGF, RRR आणि बाहुबली यांसारख्या चित्रपटांचा खूप अभिमान आहे. आपण सर्वजण या चित्रपटांपासून प्रेरित झालो आहोत आणि एवढ्या मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारे चित्रपट देखील आम्हाला करायचे आहेत, परंतु मला वाटते की यासाठी मोठ्या प्रमाणावर माध्यम जबाबदार आहेत. त्या काळात काही मीडिया सदस्य होते जे 'बॉलिवूडवर बहिष्कार टाका... बॉलिवूड ये है, वो है... ड्रग्ज आणि या सगळ्यामुळे बॉलिवूडला लाज वाटली पाहिजे' असा प्रचार करत होते.

रणबीर कपूर पुढे म्हणाला, “मी फक्त एवढंच सांगेन की आमचं काम तुमचं मनोरंजन करणं आहे. पण 'तुम्हाला चित्रपट पाहायचा नाही तर नका बघू … तुम्ही चित्रपटाविषयी खोटं वर्णन का करता?' इथे फक्त कलाकारच काम करत नाहीत तर अनेक लोक आहेत जे या इंडस्ट्रीमध्ये काम करतात, 'तुम्ही त्यांच्या पोटावर लाथ का मारता?

“मला हा खरोखर मूर्खपणा वाटतो. चित्रपटाचे प्रमोशन करत असताना मला अनेक पत्रकार परिषदांमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला गेला. तुम्ही माझ्या पोटावर पाय देत आहेत. माझ्या इंडस्ट्रीवर लाथ मारत आहेत, यावर मी काय बोलणं तुम्हाला अपेक्षित आहे? सोशल मीडियावर काहीतरी वाचतात मग मला विचारतात आणि जेव्हा मी माझे मत देतो तेव्हा त्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. हा सर्व मूर्खपणा सुरू आहे,” असा निष्कर्ष रणबीरने काढला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com