Ranbir Kapoor: अन् रणबीरच्या प्राध्यपकांनी त्याच्या कानशिलात लगावली... किस्सा सांगताना रणबीरचं हसू आवरेना

भिनेता रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'तू झुठी मैं मक्कर' मध्ये व्यस्त आहे.
Ranbir Kapoor
Ranbir KapoorSaam Tv

Ranbir Kapoor On The Kapil Sharma Show: अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'तू झुठी मैं मक्कर' मध्ये व्यस्त आहे. लव रंजन दिग्दर्शित चित्रपटात रणबीरसोबत श्रद्धा कपूरही दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाची टीम द कपिल शर्मा शो मध्ये पोहोचली होती. यावेळी रणबीरने त्याच्या शालेय जीवनातील काही मनोरंजक किस्से चाहत्यांसोबत शेअर केले.

Ranbir Kapoor
Dilip Joshi Threat: 'जो माझ्या जीवावर उठलाय त्याचं भलं होवो...' दिलीप जोशींनी मारेकऱ्यांवर व्यक्त केली प्रतिक्रिया

त्याचा हा टीझर सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. रणबीर म्हणतो, "शाळेत माझा लेक्चर सुरु होता. त्या लेक्चरमध्ये मला बराच कंटाळा आल्यामुळे मी वर्गाबाहेर पडलो. शिक्षकांना समजु नये म्हणून गुडघ्यावर रेंगाळत रेंगाळत बाहेर पडलो. बाहेर पडताच माझ्या समोर आमच्या शाळेच्या मुख्यध्यापिका उभ्या होत्या. त्यांनी मला अशा पद्धतीने मी बाहेर जात होतो म्हणून कान धरुन एक कानाखाली दिली. माझ्या केसांना धरुन त्यांनी हे काय चालू आहे, असा प्रश्न विचारला."

रणबीर कपूरचीही स्टोरी ऐकून अर्चना पूरण सिंग आणि कपिल शर्मा मोठ्याने हसायला लागतात. रणबीरच्या चाहत्यांसाठी ही एक मजेदार गोष्ट होती. त्याचवेळी रणबीर कपूर मुलगी राहा कपूरबद्दलही मनोरंजक भाष्य करतो.

राहाचा जन्मापासून ती कोणासारखी दिसते सर्वच येऊन आपले तर्कवितर्क लावत आहेत. काहीवेळा आलिया भट्टचे कुटुंबीय आणि माझे कुटुंबीय सर्वच गोंधळलेले असतात की राहाचा चेहरा नक्की कोणासारखा दिसतो? पण एक महत्वाची बाब म्हणजे, राहाचा चेहरा हा आमच्या दोघांसारखा मिळता जुळता आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com