
Ranbir Kapoor's first look in Animal: बॉलिवूड म्हणजे जोश, जल्लोष आणि सिलेब्रेशन. बॉलिवूडमध्ये प्रत्येक गोष्ट उत्साहात साजरी केली जाते. सगळे बॉलिवूड सेलिब्रिटी नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न आहेत. अनेक सेलिब्रिटी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी परदेशी गेले आहेत. पण या वर्षी रणबीर कपूर मात्र वेगळ्या पद्धतीने नवीन वर्ष सिलेब्रेट करत आहे. रणबीर चाहत्यांना नवीन वर्षाची भेट देणार आहे.
रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला रणबीर कपूरच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'अॅनिसल'चा फर्स्ट लूक पाहायला मिळाल्यामुळे रणबीरचे चाहते खूप आनंदी झाले आहेत.
अॅनिमल चित्रपटातील प्रदर्शित झालेल्या लूकमध्ये रणबीर रागात दिसत आहे. लांब दाढी, कुरळे केस आणि रक्ताने माखलेला रणबीर खूपच इन्टेन्स लूकमध्ये दिसत आहे. रणबीरच्या प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये त्याच्या हातात कुऱ्हाड दिसत आहेत, तसेच सिगारेट ओडत तो कोणाला तरी खुन्नस देत आहे. या लूकवरून रणबीरचे संपूर्ण पात्र किती इन्टेन्स हे तुम्हाला समजले असेल.
अॅनिमलमध्ये रणबीर कपूर पहिल्यांदाच अशा वेगळ्या अवतारात दिसणार आहे. या क्राईम ड्रामा चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. त्याचबरोबर रणबीरच्या नव्या चित्रपटाबाबत चाहतेही खूप उत्सुक आहेत. रणबीर कपूरची अॅनिमल या चित्रपटापासून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. 'अॅनिसल' या चित्रपटातील रणबीरचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या क्राईम ड्रामा चित्रपटात रश्मिका मंदाना रणबीर कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती धामी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.
रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे. कबीर सिंग फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट टी-सीरीजच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे.
रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली. या चित्रपटात आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत दिसली होती. आता रणबीरचा आणखी एक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. पोस्ट प्रोडक्शनचे काम जोरात सुरू आहे. रणबीर कपूरही पहिल्यांदाच रश्मिका मंदान्नासोबत दिसणार आहे. चाहत्यांनाही या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.