जयंतीदिनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं पोस्टर रिलीज; रणदीप हुड्डा साकारणार सावरकरांची भूमिका
मुंबई : आज २८ मे... स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar ) यांची १३९ वी जयंती आहे. सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ साली नाशिकच्या (Nashik ) भगूर गावात झाला होता. देशात सावरकरांच्या विचारसरणीवरून अनेक वाद-विवाद आजही सुरू आहेत. त्यामुळं आजच्या काळातही सदैव चर्चेत राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे सावरकर. या महान वीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ( bollywood actor Randeep Hooda shares his first look from the veer savarkar movie )
हे देखील पाहा -
देशाच्या राजकारणात सदैव चर्चेत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे वीर सावरकर. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या त्यांच्यावरील आधारित सिनेमात अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda ) हा सावरकारांची भूमिका साकारणार आहे. त्यानं स्वत: सिनेमाचा पहिला लुक सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली आहे. रणदीप हुड्डा ट्विट करत म्हणाला की,'भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महान नायकाला सलाम. मला विश्वास आहे की, मी एका महान क्रांतिकारकाची भूमिका योग्यरित्या निभावेल. त्यांची खरी कहाणी तुमच्या पर्यंत घेऊन येईल. त्यांचं खरं व्यक्तिमत्व अनेक वर्षांपासून समोर आणलं गेलं नव्हतं'. रणदीप हुड्डा यांनी ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देणे सुरू केलं आहे.
रोहित कौशिक या नेटकऱ्यान म्हटलं आहे की, 'हुड्डा भाऊ, तु्म्ही सरबजीत सिंह यांची भूमिका साकारली होती, ती आम्ही सर्वांनी पाहिली होती. त्यामुळं अजिबात शंका नाही की, तुम्ही वीर सावरकरांचं व्यक्तिमत्व पडद्यावर जिवंत कराल'.
दरम्यान, ' अभिनेता रणदीप हु्ड्डा हा आगामी 'स्वातंत्र वीर सावरकर' या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात हुड्डा हा राजकीय नेते,स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि लेखक विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमाचा पहिला लुक हुड्डाने ट्विटरवर शेअर केला आहे. हुड्डा सिनेमाच्या पोस्टर मध्ये नीट ओळखूही येत नाही. हुबेहुब सावरकर दिसताहेत. तर या सिनेमाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आहे. याआधीही रणदीप हुड्डा हा २०१६ साली'सरबजीत' या सिनेमात दिसला होता. त्या सिनेमात त्यानं चांगला अभिनय केला होता.
Edited By - Vishal Gangurde
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.