Ranveer Singh Emotional Video: आई-वडिलांसमोर रणवीर सिंगला रडू आवरेना, 'या' जुन्या आठवणीने अभिनेता झाला भावुक

रणवीर सिंगचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर त्याच्या संघर्षाचे दिवस आठवून भावूक झाला आहे.
Ranveer Singh Get Emotional During an Award Show
Ranveer Singh Get Emotional During an Award ShowSaam TV

Ranveer Singh Viral Video: दुबईमध्ये आयोजित 'फिल्मफेअर मिडल ईस्ट अचिव्हर्स नाईट 2022' मधील रणवीर सिंगचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर त्याच्या संघर्षाचे दिवस आठवून भावूक होताना दिसला. व्हिडीओमध्ये अभिनेता रणवीर फिल्मफेअर पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर गेला होता, या कार्यक्रमाला त्याचे आई-वडील देखील उपस्थित होते.

व्हिडिओमध्ये रणवीर त्याच्या संघर्षाचे दिवस आठवत म्हणतो, पप्पा तुम्हाला आठवत असेल जेव्हा १२ वर्षांपूर्वी मी अभिनेता बनण्यासाठी आणि माझा पोर्टफोलिओ बनवण्याचा प्रयत्न करत होतो. त्या काळात पोर्टफोलिओ बनवण्यासाठी 50 हजार रुपये खर्च येत होता. मग मी म्हणालो पप्पा खूप महाग आहे, पण मग तुम्ही म्हणालात काळजी करू नको तुझे पप्पा अजून आहेत.

Ranveer Singh Get Emotional During an Award Show
Isha Ambani Blessed With Twins: मुकेश अंबानी पुन्हा झाले आजोबा, मुलगी ईशाने दिला जुळ्या मुलांना जन्म

त्यानंतर रणवीर त्याच्या आईला म्हणाला, "मम्मी तुला आठवतंय ना, जेव्हा आपण त्या छोट्या घरात राहत होतो आणि तेव्हा मी माझे ऑडिशन देऊन आलो होतो, जे खूप वाईट गेले होते, त्यावर मी तुला म्हणालो की माझे स्वप्न कधीच पूर्ण होणार आहे की नाही."

मॅराकेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, 2022 मध्ये भाग घेऊन त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडिओमध्ये रणवीरने मरून शेरवानी घातली आहे. त्याच्या हातात 'Etoile d'Or' पुरस्कार दिसत आहे. या सोहळ्यातील फोटो शेअर करत रणवीरने लिहिले आहे की, मला या प्रतिष्ठेच्या 'इटोइल डी'ओर' पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी चित्रपट महोत्सवाचे आभार व्यक्त करतो. माझ्या संस्कृतीचे आणि भारतीय चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रतिनिधित्व करताना मला अभिमान वाटतो. (Award)

रणवीर सिंग लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस या कॉमेडी ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट गुलजार दिग्दर्शित अंगूर या चित्रपटाचा रिमेक आहे. यंदाच्या ख्रिसमसला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Movie)

याशिवाय तो करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात आलिया भट्टसोबत दिसणार आहे. या चित्रपटात तो एका श्रीमंत कुटुंबातील एकुलत्या एक मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर आलिया भट्ट एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीर आणि आलियाची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी 28 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. (Bollywood)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com