Salman-Sajid Nadiadwala: वादानंतर सलमान-साजिद पुन्हा येणार एकत्र? बॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटात दिसणार ही जोडी

Salman Khan and Sajid Nadiadwala: साजिद आणि सलमान पुन्हा एकदा नवीन चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार असल्याची बातमी आहे.
Salman Khan and Sajid Nadiadwala To Reunite
Salman Khan and Sajid Nadiadwala To ReuniteInstagram

Salman Khan and Sajid Nadiadwala To Reunite: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटांसह सलमान त्याच्या इंडस्ट्रीतील वादामुळे बऱ्याचदा लोकांच्या चर्चेचा विषयी बनतो.

साजिद नाडियादवाला देखील सलमानच्या या चित्रपटाचा भाग होता. परंतु काही मतभेदांमुळे दोघांनी एकत्र काम करणे थांबिवले. आता साजिद आणि सलमान पुन्हा एकदा नवीन चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार असल्याची बातमी आहे.

Salman Khan and Sajid Nadiadwala To Reunite
Rashmika-Shreyas Talpade:भर स्टेजवर श्रीवल्लीने केलं किस; रश्मिकाच्या प्रेमात श्रेयस लाजून झाला चूर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, साजिद याआधी सलमानसोबत त्याच्या आगामी चित्रपटाचा भाग होणार होता. परंतु दोघांमधील भांडणांमुळे साजिदने सलमानच्या चित्रपटाला रामराम केला. मात्र, याचा सलमान आणि साजिदच्या मैत्रीवर कोणताही परिणाम झालेला नाही.

सलमानच्या आगामी चित्रपटा 'किसी का भाई किसी की जान' मध्ये ही जोडी एकत्र दिसणार नसली तरी 'किक २'मध्ये हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

सलमानचा 'किक' हा चित्रपट 2014 साली रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवरही हा चांगलाच हिट ठरला होता. याशिवाय सलमान 'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत शाहरुख खानही दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही निश्चित झाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com