उत्तम ॲक्शन, दमदार अभिनय आणि... असा आहे सलमानच्या Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan चा Film Review...

सलमानच्या ‘किसी की भाई किसी की जान’ बहुचर्चित चित्रपटाचा रिव्ह्यू...
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Film Review
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Film ReviewSaam Tv
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Film Review(2 / 5)

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Film Review: सलमान खानचा चित्रपट ‘किसी की भाई किसी की जान’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमानसोबत पूजा हेगडे, सतीश कौशिक, व्यंकटेश आसिफ शेख, सिद्धार्थ निगम, शहनाज गिल, राघव जुयाल, विनाली आणि पलक तिवारी हे कलाकार चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. चला तर जाणून घेऊया सलमानच्या या बहुचर्चित चित्रपटाचा रिव्ह्यू...

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Film Review
Nagraj Manjule New Movie: नागराज मंजुळेंच्या नवीन चित्रपटाचं चांगभलं! मराठमोळे कुस्तीपटू खाशाबा जाधवांचा जीवनपट उलघडणार

दिल्लीत राहणाऱ्या भाईजानची (सलमान खान) ही कथा आहे, आपल्या तीनही भावांची जबाबदारी स्वत:वर आल्यामुळे लग्न करत नाही. लग्न न होण्यामागचे कारण म्हणजे सलमान आणि त्याच्या भावांना कोणत्याही महिलेने वेगळे करायचे नाही. यामुळे त्याने लग्न केले नाही. लव (सिद्धार्थ निगम), मोह (जस्सी गिल) आणि इश्क (राघव जुयाल) असे हे तीन भाऊ. पण तिघेही आपल्या भावाला न समजता गुपचूप प्रेमात पडले.

आता आपल्या भावासमोर आपल्या प्रेमाची कबुली देण्याऐवजी तिघेही आपल्या भावाचे प्रेम शोधण्यासाठी बाहेर पडतात. मात्र, त्याचे मिशन सुरू होण्यापूर्वीच संपते आणि मग भाग्यलक्ष्मी (पूजा हेगडे) त्याच्या आयुष्यात येते. हिंसक भाई आणि भाग्यलक्ष्मीचे नेहमीच शांत राहणारे कुटुंब एकत्र येईल की त्यांच्या कथेचा 'शेवट' होईल? त्याची रंजक कहाणी जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. (Bollywood Film)

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Film Review
Manoj Bajpayee : मनोज बाजपेयीचा वाढदिवस; गँग्स ऑफ वासेपूर नाही, तर 'ही' आहे अभिनेत्याची सर्वाधिक रेटिंग असलेली कलाकृती

चित्रपटाचे दिग्दर्शन

‘किसी की भाई किसी की जान’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. कथेबद्दल बोलायचे तर, कथा ओळखीची असूनही, स्क्रिप्टमध्ये केलेले बदल (वीरमचा रिमेक) आपल्याला शेवटच्या दृश्यापर्यंत चित्रपटाशी जोडून ठेवतात. पहिल्या १० मिनिटात चित्रपटात दिसणारी ॲक्शन, कॉमेडी, गाणी आणि काही सीन्स पाहिल्यावर चित्रपट किती मनोरंजनात्मक आहे, याची माहिती देतो. भाईजानचे कुटुंब आणि त्याच्या भावांवरील प्रेम हा या कथेचा आत्मा आहे, फरहाद सामजीनेही ॲक्शन आणि कॉमेडीमध्ये या प्रेमाची भावना शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याचे उत्तम काम केले आहे. (Entertainment News)

म्यूझिक

चित्रपटाचे संगीत बरेच धमाकेदार आहे. बिल्ली हो, वेंटममा सारखी गाणी प्रेक्षकांना फारच भावली. गाण्यांसोबतच पार्श्वसंगीतही खूप प्रभावी आहे. राऊडी अण्णाचा खुलासा असो, किंवा सलमानचा रोमान्समधून ॲक्शन सीन्सकडे जाणे असो, प्रत्येक सीन्समध्ये आणि काही ट्रान्सफॉर्मेशनमध्ये संगीताचा प्रभावीपणे वापर केला गेला आहे.

सिनेमॅटोग्राफी

दिल्ली, हैदराबादसह उत्तर आणि दक्षिण भागात दिसणारे बदल वेगवेगळ्या लोकेशन कॅमेऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुंदरपणे दाखवले आहेत. भाईजान राहत असणारा परिसर तुम्हाला खूप काही जुन्या सेट्सची आठवण करून देईल. ॲक्शन सीन्ससाठी बरेच ॲडव्हान्स शॉट्स वापरण्यात आले आहेत, ज्यांना ॲक्शन आवडते त्यांच्यासाठी हा चित्रपट खूपच मनोरंजक आहे.

कलाकारांचा अभिनय

चित्रपटात सलमान प्रमुख भूमिकेत असून त्याचा लूक चाहत्यांना फारच भावला. सलमान खान आणि पूजाची लव्ह केमिस्ट्री प्रेक्षकांच्या बरीच पसंदीस उतरली. चित्रपटात दिसलेल्या 6 नवीन चेहऱ्यांपैकी पलक तिवारीच्या चेहेऱ्यावरील हावभाव आणि अभिनय सर्वांनाच प्रभावित करतो. सिद्धार्थ निगम, राघव आणि जस्सी गिल यांनी आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शहनाज गिलने केलेल्या अभिनयातून प्रेक्षकांसमोर जादू चालवली नाही. व्यंकटेशचे पात्र सशक्त आहे. रोहिणी हट्टंगडी यांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने तिच्या पात्राला जीवदान दिले आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Film Review
Amitabh Bachchan Tweet: हात जोडतो... पैसे भरले, आता तरी ब्लू टिक द्या; बिग बींचं ट्वीट

चित्रपटातील त्रुटी

शहनाज गिलला आपल्या भाषाशैलीवर बरेच काम करण्याची गरज आहे. उत्तम स्क्रिप्ट असूनही काही संवाद आणि ॲक्शनचा काहीही संबंध नसतानाही ते सीन्स वापरले आहे. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अशी काही दृश्ये आहेत, ज्याचा अंदाज येतो आणि ते नसले तरी चालले असते. चित्रपटात अनेक ठिकाणी तेलुगू भाषा वापरली असून सबटायटल्सचा वापर करत त्या गोष्टी समजायला सोपं झालं असतं.

निष्कर्ष

या चित्रपटाला आजच्या भाषेत ओल्ड स्कूल फिल्म म्हणता येईल. पण अशा चित्रपटांचा आजही वेगळा प्रेक्षकवर्ग आहे, यामुळे कोरोनानंतर चित्रपटगृहात जाणे कमी झाले आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा अशाच प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणू शकतो. या चित्रपटाचा नायक सुपर हिरोप्रमाणे लढत असला तरी पुढच्याच क्षणी तो सामान्य माणसाप्रमाणे प्रेक्षकांशी जोडला आहे.

बॉलीवूड मसाला चित्रपट असून कॉमेडी फॅमिली असलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटात नाटक, भावना, अ‍ॅक्शन, ट्विस्ट आणि भरपूर कॉमेडी अशी चित्रपटाची कथा आहे, चित्रपटाची कथा प्रेक्षकांना शेवट पर्यंत खुर्चीला खिळवून ठेवतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com