Alizeh Agnihotri: सलमानच्या भाचीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, लवकरच येणार चित्रपटात

सलमान खानची भाची लवकरच बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तिचा आगामी चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. तिच्या परिवारातील बरेच सदस्य बॉलिवूडमध्ये सध्या सक्रिय आहे.
Salman Khan And Alizeh Agnihotri
Salman Khan And Alizeh AgnihotriSaam Tv

Alizeh Agnihotri Entry In Bollywood: अभिनेता सलमान खानच्या कुटुंबातील बरेच कुटुंबीय बॉलिवूड क्षेत्रात आहे. पटकथा लेखन, अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मितीपासून खान कुटुंबातील एक ना एक सदस्य बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आता या घराण्याची पुढची पिढीही बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वी अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहानच्या पदार्पणाचीही चर्चा होत होती.

Salman Khan And Alizeh Agnihotri
Munawar Farooqi : स्टॅंडअप कॉमेडियन मुनावर फारुकी पुन्हा चर्चेत? शो होण्याआधीच भाजपने पोलीस आयुक्तांकडे 'ही' मागणी...

आता पुन्हा एका नवी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री इंडस्ट्रीत येण्यासाठी सज्ज झाली आहे. अलीझेहच्या पदार्पणाबद्दल खान कुटुंब बरेच उत्सुक आहेत.अलीजेह ही सलमान खानची बहीण अलविरा खान अग्निहोत्री आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे.

Salman Khan And Alizeh Agnihotri
Bigg Boss Marathi 4: किरण पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार?, स्पेशल पॉवर कोणाकोणाची खेळी करणार?

अलीझेह अग्निहोत्रीचा डेब्यू चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. मात्र आता अखेर त्याची घोषणा करण्यात आली आहे. अलीझेह राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांच्या चित्रपटातून पदार्पण करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे कामही सुरू झाले असून चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही.

Salman Khan And Alizeh Agnihotri
Sara Ali Khan: साराने दिल्या एक्स बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा, ब्रेकअपनंतर पहिल्यांदा म्हणाली…

मीडिया रिपोर्टनुसार, अलीझेहचा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. अलीझेह अग्निहोत्री 22 वर्षांची आहे. अलीझेहचे वडील अतुल अग्निहोत्री देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. नाना पाटेकर यांच्यासोबत 'क्रांतीवीर' या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत होते. तर आई अलविरा खान अग्निहोत्री या चित्रपट निर्मात्या तसेच फॅशन डिझायनर आहेत.

Salman Khan And Alizeh Agnihotri
Sajid Khan: साजिदच्या आयुष्यात वादाची वेगळी भूमिका, लहान वयातच गेला थेट तरुंगात !

सौमेंद्र पाधी यांनी वेब सीरिज जामतारा 1 आणि 2चे दिग्दर्शन होते. 'बुधिया सिंग: बॉर्न टू रन' या चित्रपटासाठी त्यांना प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. अलीझेहबद्दल बोलायचे तर ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी मॉडेलिंगमध्ये खूप सक्रिय होती. सोशल मीडियावरही ती बरीच सक्रिय असते. अलिझेह अभिनय विश्वात काय चमत्कार करणार हे लवकरच कळेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com