Tiger 3: ५७ व्या वर्षी 'टायगर' दिसतोय २७ वर्षांचा तरुण, लूक पाहून चाहते भाईजानच्या प्रेमात

सलमानच्या 'टायगर 3'ची शूटिंग तुर्कीत काही भागांची शूटिंग पुर्ण झाली असून तिथल्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.
Tiger 3 Salman Khan Viral Look
Tiger 3 Salman Khan Viral LookTwitter

Tiger 3 Salman Khan Viral Look: सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'टायगर 3' या चित्रपटाच्या सेटवरून काही फोटो लीक झाले आहेत. सलमान खानने नुकतेच या चित्रपटातील काही भागांची शूटिंग तुर्कीत पुर्ण केली. आता तिथल्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. सलमान खानचे हे व्हायरल फोटो पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता आणखी वाढली आहे.

Tiger 3 Salman Khan Viral Look
Box Office Collection: 'तू झूठी मैं मक्कार' चित्रपटाची बॉक्स ऑफिस यशस्वी कामगिरी; अवघ्या काही दिवसात पार केला ५० कोटींचा टप्पा

व्हायरल फोटो पाहून, सलमान परदेशात ॲक्शन सीनचे चित्रिकरण करत असल्याचे कळत आहे, तो सीन शूट करत असताना त्याचे फोटो क्लिक केले गेले आहेत. न पाहिलेल्या फोटोंमध्ये सलमान तपकिरी शर्ट आणि काळ्या पॅन्टमध्ये दिसत आहे. चित्रपटाची शूटिंग तुर्कस्तानात होत असून, सेटवरील एका फोटोत सलमान बोटीवर बसलेला दिसत आहे. तर आणखी एका फोटोत सलमान स्टंट डायरेक्टरसोबत बोलताना दिसत आहे. तर आणखी एका फोटोमध्ये अॅक्शन डायरेक्टर कारमध्ये शूटिंग करताना दिसत आहेत.

यापूर्वीही या आउटफिटमधला सलमानचा फोटो व्हायरल झाला होता. 2021 मध्ये जेव्हा सलमान याच चित्रपटासाठी तुर्कीला रवाना झाला होता त्यावेळी ही त्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. 'टायगर 3'मध्ये सलमानची सहकलाकार कतरिना कैफ आहे, जी पाकिस्तानी गुप्तहेर झोयाची भूमिका साकारत आहे.

Tiger 3 Salman Khan Viral Look
Urvashi Dholakia Photo: 'तू नक्की आई आहेस ना?' ४३ वर्षीय कोमोलिकाची कातिल करणारी अदा पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न

'टायगर 3' हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर भारतात प्रदर्शित होणार होता, मात्र आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सोबतच सलमानचा आणखी एक चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे, तो चित्रपट म्हणजे, 'किसी का भाई किसी की जान'. तो चित्रपट यावर्षी २१ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. फरहाद सामजीच्या या चित्रपटात सलमानसोबत पूजा हेगडे आहे.

यात राघव जुयाल, शहनाज गिल, पलक तिवारी, व्यंकटेश आणि सिद्धार्थ निगम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सलमान यापूर्वी शाहरुखच्या 'पठान'मध्ये दिसला होता जिथे तो टायगरच्या भूमिकेत खास कॅमिओमध्ये दिसला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com