
Salman Khan News: बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान याचा गर्लफ्रेंडची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. यावेळी दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडेशी त्याचे नाव जोडण्यात येत आहे. सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्या नात्याचे गूढ ते दोघेच सांगू शकतात. सलमान खानचे अनेक अभिनेत्रींसोबत नेहमीच जोडले जात असते. सलमानच्या गर्लफ्रेंडसह चर्चा होते ती त्याच्या संपत्तीची.
मीडिया रिपोर्टरनुसार सलमानकडे ३००० कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. सलमानने हे संपत्ती चित्रपट, टीव्हीवरील जाहिराती प्रॉपर्टी अशा अनेक सोर्समार्फत मिळवली आहे. सलमान त्याचा गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये कुटुंबसोबत राहतो.
सलमान राहत असलेल्या तीन मजली सी-फेसिंग अपार्टमेंटची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपार्टमेंटशिवाय सलमान खानच्या मुंबईत बऱ्याच प्रॉपर्टी आहेत ज्यांची किंमत करोडो रुपये आहे. सलमान खानचा महाराष्ट्रातील पनवेलमध्ये 150 एकरात पसरलेले आलिशान फार्महाऊस आहे.
या आलिशान फार्महाऊसमध्ये स्विमिंग पूलपासून ते जिमपर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सलमान खान अनेकदा त्याच्या जवळच्या लोकांसोबत त्याच्या फार्म हाऊसवर जात असतो. तसेच या फार्म हाऊसचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत असतात. सलमानचे दुबईमध्ये द अॅड्रेस डाउनटाऊन, बुर्ज खलिफाजवळ एक आलिशान घर आहे.
सलमान खान सध्या बिग बॉस १६ होस्ट करत आहेत. तसेच तो त्याच्या आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये त्याच्या पूजा हेगडे आणि शहनाज गिल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.