Satish Kaushik Passed Away: काही तास आधी मित्रांसोबत होळी सेलिब्रेशन; पाहा सतिश कौशिक यांचे निधनापूर्वीचे फोटो

Bollywood News: सतीश कौशिक निधनाच्या काही तासांपूर्वी होळीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते.
Satish Kaushik
Satish Kaushik Saam TV

Satish Kaushik Death: बॉलिवूड  अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. सतीश कौशिक यांनी आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली. सतीश कौशिक निधनाच्या काही तासांपूर्वी होळीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी त्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बुधवारी रात्री होळीच्या सेलिब्रेशनचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये जावेद अख्तर, बाबा आझमी, शबाना आझमी, तन्वी आझमी यांचासोबतच अली फजल आणि रिचा चढ्ढा देखील दिसत आहेत. जानकी कुटीर जुहू येथे होळीच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. (Latest News Update)

Satish Kaushik
Satish Kaushik Death: बॉलिवूडवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन

सतीश कौशिक होळीचा आनंद घेत असल्याचं या फोटोंमधून दिसत आहे. मात्र त्यानंतर अचानक आलेल्या त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाबाबत ट्विटरवर ट्वीट करत माहिती दिली.

Satish Kaushik
Ranbir Kapoor Interview: आमच्या पोटावर लाथ मारू नका..., बॉयकॉट बॉलिवूडवर रणबीर कपूरने दिली प्रतिक्रिया

सतीश कौशिक यांनी कारकीर्द

हरियाणात जन्मलेले सतीश कौशिक अभिनेते, दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला. त्यांना सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. मिस्टर इंडियामध्ये त्यांची कॅलेन्डरची भूमिका प्रचंड गाजली. सतीश कौशिक यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शिक्षण घेतलं. सतीश कौशिक यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्येही शिक्षण घेतले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com