
Shah Rukh Khan And Gauri Khan Dance Viral Video: अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे सध्या तिच्या लग्नामुळे बरीच चर्चेत आली आहे. नुकतंच अलानाने तिचा परदेशातील बॉयफ्रेंड इव्होर मॅकेसोबत १६ मार्चला लग्नगाठ बांधली. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लग्नाला हजेरी लावली होती.
सध्या यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे. यावेळी शाहरुख आणि गौरी खानने देखील हजेरी लावली होती. यांच्या डान्सने इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत, बॉलिवूडचा बादशाह आणि त्याची पत्नी गौरी डान्स करीत आहे. अलानाची आई गौरी आणि शाहरुखला डान्स करण्यासाठी आमंत्रित करते. आमंत्रित करताच त्यांनी डान्सवर ठेका धरताच सोशल मीडियावर ट्रेण्ड झाले. यावेळी शाहरुखने काळया रंगाची कोट आणि पँट घातली आहे तर, गौरीने हिरव्या रंगाचा गाऊन घातला.
ही जोडी या ड्रेसमध्ये बरीच सुंदर दिसत असून सोशल मीडियावर त्यांची बरीच चर्चा होते. अलीकडे, सुहाना खानने अलानाच्या संगीत सेरेमनीत बारीक नक्षीकाम केलेली साडी घातली होती. त्यावर तिने मॅचींग स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला होता.
सुहानाने तिच्या लूकला मिनिमल ॲक्सेसरी, मेकअप आणि फ्री हेअर डू सोबत पूर्ण केले. यावेळी तिने हाय हिल्सच्या सँडल घातल्या होत्या. सुहानाने ही साडी आपल्या आईची अर्थात गौरी खानची घातली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.