Besharam Rang Song Troll: दीपिका- शाहरुखला एका गावरान पठ्ठ्याने दिली टक्कर, 'बेशरम' अदा पाहून तुम्हीही लोटपोट हसाल...

सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा 'पठान' चित्रपट कमालीचा चर्चेत आहे. चित्रपटाला चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वत्र ट्रोल करत आहेत.
Besharam Rang Song
Besharam Rang SongSaam Tv

Besharam Rang Song Troll: सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा 'पठान' चित्रपट कमालीचा चर्चेत आहे. चित्रपटाला चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वत्र ट्रोल करत आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वीच चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. गाणं सोशल मीडियावर शेअर होताच अवघ्या काही तासांतच त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सध्या बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांना बॉयकॉटचा सामना करावा लागत आहे.

Besharam Rang Song
Pathaan Controversy: 'पठान' चित्रपटावर मुकेश खन्ना संतापले, म्हणाले 'ही थेरं भारतात चालणार नाही'

चित्रपटातील दीपिकाचा बोल्ड अंदाज पाहून सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. खरं तर तिचा तो बोल्ड अंदाज कधी प्रेक्षकांनी पाहिला नव्हता, अशा बोल्ड अंदाजात दीपिका गाण्यात दिसत आहे. तिच्या या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कारण गावाकडच्या अशाच एका तरुणाने बेशरम गाण्यावर त्याच्या दिलखेचक अदांनी, बोल्ड अंदाजातील डान्सने शाहरुख- दीपिकाला त्याने चांगलीच टक्कर दिली आहे.

Besharam Rang Song
Pathan: 'चित्रपटावर बोलण्यापेक्षा देशातील समस्यांवर बोला...', 'बेशरम रंग' ची गायिका जरा स्पष्ट बोलली...

हे गाणं दिवसेंदिवस अधिकच हिट होताना दिसत आहे. या गाण्यावर त्या तरुणाला ही थिरकण्यापासून कोणी आवरु शकले नाही. त्याने कॅमेऱ्यासमोर दीपिकाने गाण्यात दिलेल्या अदा जशाच्या तशा देण्याचा प्रयत्न तरुणाने केला आहे. तरुणासोबत त्याचे मित्रही गाण्यावर जबरदस्त ठुमके लावताना व्हिडीओत दिसत आहेत. तरुणाने बेशरम रंग या गाण्यावर रिक्रिएट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांना आकर्षित केलं असून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही या व्हिडीओवर होत आहे.

Besharam Rang Song
Laxmikant Berde: लव्ह, लग्न, लोच्या; लक्ष्मीकांत बेर्डेंचं खरं आयुष्य कसे होते? वाचा सविस्तर...

या व्हिडीओला नेटकऱ्यांनी तीस हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स दिले असून या व्हिडीओला बऱ्यापैकी व्ह्युजही मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. “शाहरुख आणि दीपिकापेक्षा चांगला व्हिडीओ आहे.” तर काहींनी गाण्यालाच नापसंदी दर्शवली. त्यात #boycottpathaan असा ट्रेंडही सुरु झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षी २५ जानेवारीला पठाण सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com