Sonu Sood: सोनू सूदने ग्रॅज्युएट चहावालीच्या आयुष्यात आणला गोडवा, बिहारच्या होतकरू तरुणीला अशी केली मदत

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने ट्विट करून प्रियांकाला मदत केल्याचे सांगितले आहे.
Sonu Sood help Priyanka Gupta to save her business
Sonu Sood help Priyanka Gupta to save her businessSaam Tv

Sonu Sood News: बिहारमधील पदवीधर चहा विक्रेती प्रियंका गुप्ता हिच्यावर महापालिकेने केलेल्या कारवाईनंतर अनेक लोक तिच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. एकीकडे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंहने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर दुसरीकडे आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने ट्विट करून प्रियांकाला मदत केल्याचे सांगितले आहे.

सोनू सूदने ट्विटमध्ये लिहिले, “प्रियांकाच्या चहाच्या दुकानासाठी जागेची व्यवस्था केली आहे. आता प्रियांकाला तिथून कोणी काढणार नाही. लवकरच बिहारला येऊन तुझ्या हातचा चहाचा घेईन." त्यावर प्रियंका गुप्ताने उत्तर देत म्हटले की, ती लवकरच सोशल मीडियावर तिच्या नवीन दुकानाची माहिती देईल.

Sonu Sood help Priyanka Gupta to save her business
Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरातून गौतम विग बाहेर, सौंदर्या शर्माला अश्रू अनावर

पटना महापालिकेचे पथक बुलडोझरसह अतिक्रमणावर कारवाई करत होते. दरम्यान, बोरिंग रोडवरील ग्रॅज्युएट चहावाली प्रियांका गुप्ताचा स्टॉलही हटविण्यात आला. महापालिकेच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या प्रियांकाने रडत रडत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये प्रियंका म्हणाली होती की, “हे आमचे बिहार आहे. इथे मुली फक्त स्वयंपाकघरामध्येच काम करतात. मी माझी जागा विसरले होते. लग्न आणि चूल-मुलं इतकंच करायला हवं होतं. माझ्यासाठी व्यवसाय करणे चुकीचं आहे. मी आता माझ्या सर्व फ्रँचायजी बंद करत आहे. मी सर्वांचे पैसे परत करीन. आता घरी जात आहे. धन्यवाद बिहार, धन्यवाद व्यवस्थेला आणि धन्यवाद मनपा. (Sonu Sood)

ग्रॅज्युएट चहावाली प्रियंका गुप्ताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंह तिच्या समर्थनार्थ समोर आली आहे. महापालिकेच्या कारवाईचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करताना अक्षरा सिंहने लिहिलं होत की, “एखाद्या मुलीने समाजाची व्यवस्था मोडून स्वतःहून काही करण्याची हिंमत दाखवत आहे तर सरकारी नोकरांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वजण मूक राहिले आहेत. आता त्या मुलीला वेश्या होईपर्यंत त्रास द्या. (Viral Video)

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदही ग्रॅज्युएट चहावाली प्रियांका गुप्ताच्या समर्थनार्थ पुढे आले आहे. सोनू सूदने ट्विट करत म्हटले आहे की, "प्रियांकाच्या चहाच्या स्टॉलसाठी जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. आता प्रियांकाला तिथून कोणी काढणार नाही. लवकरच बिहारला येऊन तुझ्या हातचा चहा घेईन." यावर प्रियंका गुप्ताने 'ती लवकरच सोशल मीडियावर तिच्या नवीन दुकानाची माहिती देईल, असे सांगितले आहे. (Social Media)

Sonu Sood Tweet
Sonu Sood TweetSaam Tv

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com