Suniel Shetty Launch Food Delivery App: सुनिल शेट्टीचा सिने इंडस्ट्रीला रामराम? केले नव्या क्षेत्रात पदार्पण...

Food Delivery App Waayu: बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी आता अभिनयासोबतच लवकर आणखी एका नव्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
Suniel Shetty Launch Food Delivery App
Suniel Shetty Launch Food Delivery AppSaam Tv

Food Delivery App Waayu: बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी आता अभिनयासोबतच लवकर आणखी एका नव्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. आता पर्यंत त्याने आपल्या अभिनयातून सर्वांना आपली जादू दाखवली आता लवकरच तो बिझनेसमन म्हणून आता आपल्या समोर तो येणार आहे. नुकतंच सुनील शेट्टीने नवीन फूड डिलिव्हरी ॲप लॉन्च केले आहे. या ॲपची खासियत म्हणजे, हा ॲप झोमॅटो आणि स्विगी पेक्षा कमी दरात आणि चांगल्या दर्जाचे जेवण देणार असल्याचा दावा केला आहे. सुनिलने लाँच केलेल्या ॲपचे नाव ‘वायू’असे आहे, हा ॲप मुंबईतील हॉटेल्सने एकत्र येत आणले आहे.

Suniel Shetty Launch Food Delivery App
Bigg Boss OTT 2 Host: करण जोहरने ‘बिग बॉस ओटीटी' ला केलं बाय बाय ? कोण असेल नवा होस्ट

अभिनेता सुनिल शेट्टीने सुरू केलेला ॲप हा झोमॅटो आणि स्विगी या फूड डिलेव्हरी कंपनीपेक्षा कमी दरात आणि चांगल्या दर्जाचं जेवण देणार असल्याचा दावा करत आहे. इतर ॲग्रीरेटर्स ॲपपेक्षा १५% ते २०% स्वस्त उपलब्ध करून देणार आहे. वायू ॲपच्या माध्यमातून अनेक हॉटेल रेस्टॉरंट आणि ऑनलाईन डिलेव्हरी सर्व्हिस करताना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न हा ॲप करणार आहे. अभिनेता आणि व्यावसायिक सुनिल शेट्टीची या ब्रँड अँम्बेसेडर म्हणून निवड केली असून या ॲपमधील काही हॉटेल्समध्ये त्याची गुंतवणूक देखील आहे.

वायू ॲप हा Destec Horeca चा एक भाग असून त्याची स्थापना उद्योजक अनिरुद्ध कोटगिरे आणि मंदार लांडे यांनी केली आहे. वायुला मुंबईस्थित इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR)आणि इतर उद्योग संस्थांनी पाठिंबा दर्शवला आहे. वायू ॲपसोबत मुबंईतील भगत ताराचंद, महेश लंच होम, केळीचे पान, शिवसागर, गुरु कृपा, कीर्ती महल, फारसी दरबार आणि लाडू सम्राट सोबत अनेक मुंबईतील रेस्टॉरंट्स जोडले आहेत....

Suniel Shetty Launch Food Delivery App
TMKOC's Asit Modi Accused: ‘तारक मेहता’तील अभिनेत्रीने निर्मात्यांवर लावला लैंगिक छळाचा आरोप; सांगितला ‘तो’ किस्सा

मीडिया रिपोर्टनुसार, वायू ॲप (WAAYU)रेस्टॉरंट्सकडून कोणतेही कमिशन शुल्क आकारणार नाही. यामुळे, रेस्टॉरंट्स ग्राहकांना योग्य दरात जेवण देण्याची सोय उपलब्ध करून देत आहेत. इतर फूड डिलेव्हरी ॲप्सपेक्षा हा ॲप स्वस्त असेल. ॲप लाँच करण्यामागील हेतू म्हणजे सर्वच ग्राहकांना परवडणारे, कमी वेळेत, आरोग्यदायी आणि उत्तम दर्जाचे अन्न उपलब्ध करून देणे आहे. नुकताच वायू हा ॲप लॉन्च झाला असून, सध्या स्वस्त दरात फूड डिलिव्हर करत आहे. कंपनीचा ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा मार्ग असून कंपनी ही ऑफर ग्राहकांना किती काळ देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हा ॲप Google Play Store वरुन किंवा waayu.appच्या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com