Tiger Shroff: टायगर श्रॉफला स्टंट पडला महागात, बेसिन तोडायला गेला खरा, पण...

अनेकदा टायगर त्याच्या चित्रपटाl एकापेक्षा एक धडाकेबाज अॅक्शन सीन करताना दिसतो. पण यावेळी हे थरारक अॅक्शन सीन करताना टायगर एका अपघाताचा बळी ठरला आहे.
Tiger Shroff
Tiger Shroff Saam Tv

Tiger Shroff Accident: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने आपल्या अनेक चित्रपटात अभिनय कमी स्टंटच जास्त केले आहेत. अनेकदा टायगर त्याच्या चित्रपटामध्ये एकापेक्षा एक धडाकेबाज अॅक्शन सीन करताना दिसतो. मात्र यादरम्यान हे थरारक अॅक्शन सीन करताना एका अपघाताचा तो बळी ठरला आहे.

अलीकडेच टायगरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो विचित्र स्टंट करताना दिसत आहे. हे विचित्र स्टंट त्याच्या चांगलेच अंगलट आलेले आहे. वॉश बेसिन फोडताना त्याने आपल्या पायाला दुखापत करुन घेतली आहे.

Tiger Shroff
Adipurush Postponed: प्रभासचा बिग बजेट चित्रपट 'आदिपुरुष' लांबणीवर, नेमके कारण काय?

इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत टायगरने लिहिले की, 'काँक्रीटचे वॉश बेसिन फोडताना माझा पाय मोडला कारण मला वाटले की मी आधीपेक्षा अधिक शक्तीशाली आहे.' असा प्रकार का केला हे चाहत्यांनी विचारण्याआधीच त्याने त्याचा बचाव करताना म्हटले की ते बेसिनही तुटले.

सोशल मीडियावर काहीच वेळात हा व्हिडिओ व्हायरल झाला असून चाहते त्याला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. चाहत्यांसोबत व्हिडिओवर काही कलाकार मंडळींनीही कमेंट केली आहे.

दिग्दर्शक साबीर खानने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, 'या दिवशी आम्ही 24 तास शूटिंग केली. त्यावेळचा अनुभव खुचप चांगला होता.' दिग्दर्शकाच्या कमेंटवरून हा टायगरचा जुना व्हिडिओ असल्याचं समजत आहे. या दोघांनी 'हिरोपंती', 'मुन्ना मायकल' आणि 'बागी'मध्ये एकत्र काम केले आहे.

टायगर अक्षय कुमारसोबत 'गणपत' आणि नंतर 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनॉन आहे. सोबतच यावर्षी टायगर श्रॉफचा चित्रपट 'हिरोपंती 2' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com