
Govinda Naam Mera OTT Release: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या 'गोविंद नाम तेरा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शंशाक खैतान दिग्दर्शित 'गोविंद नाम तेरा'हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचे सर्वत्र जोरदार प्रमोशन सुरु होते. चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होताच अवघ्या काही दिवसांतच सुपरहिट चित्रपट ठरला आहे. विकी सोबतच या चित्रपटात कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
शशांक खेतान यांनी 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचा जॉनर कॉमेडी क्राईम आणि थ्रिलर असा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता होती. आजवर विकी कौशल चाहत्यांना गंभीर भूमिकांमध्ये अनेकदा दिसला आहे, मात्र या चित्रपटात तो विनोदी भूमिकेत दिसला.
सध्या देशातच नाही तर जगभरात सर्वांनाच फिफा वर्ल्डकपचे वेड लागले आहे. हा चित्रपट या दरम्यान प्रदर्शित झाला असला तरी, चित्रपटाला प्रेक्षकांनी कमालीचा प्रतिसाद दिला आहे. सध्याच्या चित्रपटांची कमाई पाहता या विकीच्या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिफा वर्ल्डकप सुरु असताना देखील या चित्रपटाला ९. २ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. इतके व्ह्युज मिळुन चित्रपटाने एक नवा इतिहास रचला आहे.
सोबतच या चित्रपटात मराठमोळ्या कलाकारांचीही तगडी फौज आपल्याला दिसणार आहे. चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांमध्येही हास्याचे फवारे उडणार हे नक्की. चित्रपटात हृषीकेश जोशी, अमेय वाघ, सयाजी शिंदे या अभिनेत्यांनी चित्रपटात काम केले आहे. रणबीर कपूरदेखील चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे.
शंशाक खैतान दिग्दर्शित 'गोविंद नाम तेरा'चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर १६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने केली आहे. विकीच्या चित्रपटांविषयी बोलायचे तर, त्याच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी 'उरी द सर्जिकल स्ट्राईक'. सोबतच 'भूत' आणि 'सरदार उधम' या चित्रपटाने आपली खास जादू बॉक्स ऑफिसवर दाखवली नव्हती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.