Zeeshan Ayyub Interview: ‘अरे चलो, कोना पकडलो...’ नवाझुद्दिनसोबत रोमान्स करतानाचा अनुभव झीशान अय्युबने केला शेअर

Zeeshan Ayyub News: नवाझने आणि झीशानने हा रोमँटिक सीन कशाप्रकारे शुट केला? यावर त्यांनी भाष्य केलं आहे.
Zeeshan Ayyub In Haddi Film
Zeeshan Ayyub In Haddi FilmSaam Tv

Zeeshan Ayyub In Haddi Film

नवाझुद्दिन सिद्दीकीच्या ‘हड्डी’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. हा चित्रपट नुकताच ७ सप्टेंबरला झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. सध्या सोशल मीडियावर नवाझुद्दिन सिद्दीकीसोबतच अभिनेता झीशान अय्युब देखील चर्चेत आला आहे. चित्रपटामध्ये दोघेही प्रमुख भूमिकेत असून नवाझुद्दिनने एका तृतीयपंथीयाची तर, झीशान अय्युबने त्याच्या प्रियकरचे पात्र साकारले आहे. त्यांच्या रोमँटिक सीनची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. नवाझने आणि झीशानने हा रोमँटिक सीन कशाप्रकारे शुट केला? यावर त्यांनी भाष्य केलं आहे.

Zeeshan Ayyub In Haddi Film
Kiran Mane On Jawan Movie: '...म्हनूनच त्यांनी 'जवान'ला ठरवून डोक्यावर घेतलं', चित्रपट पाहिल्यानंतर 'साताऱ्याच्या शाहरुख'नं मांडलं मत

चित्रपटाबद्दल सांगताना अभिनेता झीशान म्हणतो, माझी व्यक्तिरेखा मला समजून घेणे माझ्यासाठी फारच कठीण जात होतं. चित्रपटामध्ये माझे पात्र एनजीओ चालवणारा, पेशाने तो वकील आहे. तो एक स्वतःच स्वतःची लढाई लढत आहे. तो चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीचा प्रियकर दाखवलाय. या भूमिकेविषयी माझ्या मनात एक सामान्य व्यक्ती दिसावा अशी भावना होती. जणू ती व्यक्ती आपल्यापैकीच एक आहे असं वाटायला हवं. हे ऑफिस, मेट्रो इत्यादी ठिकाणी दिसतात. त्यांची भूमिका अतिशय साधी आहे, पण त्यांच्याकडे लोकं जास्त लक्ष देत नाहीत.

चित्रपटातल्या माझ्या भूमिकेत एक वेगळेपणा असा आहे की, प्रेमासाठी एका तृतीयपंथीयाला कशाप्रकारे मागणी घातली जाते हे मला या भूमिकेनंतर कळलं. प्रेम म्हणजे शारिरिक गोष्ट नाही, तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात, त्याच्या शरीराच्या नाही. जर मी काही न बोलता एखाद्यासोबत एक तास घालवू शकलो तर याचा अर्थ असा की, त्या व्यक्तीची आणि आपली बॉन्डिंग खूप चांगली आहे. प्रेम हे रुहानी आहे. सेटवर मला नवाझुद्दिन नेहमीच बोलायचा, ‘अरे चलो, कोना पकडलो...’ आम्ही दोघेही, ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा’ मध्ये एकत्र ॲक्टिंग शिकलोय. आम्हाला एकमेकांना दोघांच्याही कामाची पद्धत माहिती होती.

Zeeshan Ayyub In Haddi Film
Ira Khan Video: 'आत्महत्येचा विचार येत असेल तर...' ड्रिप्रेशनमध्ये असलेल्यांना आयरा खानने दिला सल्ला, VIDEO होतोय व्हायरल

मुलाखतीत पुढे नवाझुद्दिन म्हणतो, आम्हाला दोघांनीही एकमेकांच्या कामाची पद्धत माहित असल्याने, काम अगदी सहज होत होतं. आमचा पहिलाच लग्नाचा सीन होता, दोघांनाही इतकंच सांगितलं की, लग्नाचा सीन आहे, तुमचं कोर्ट मॅरेज होणार आहे आणि तुमच्या दोघांचंही लग्न होणार आहे. आम्ही अगदी सहजरित्या अभिनय करत होतो. आम्हाला कोणत्याच पद्धतीची माहिती सांगितली नव्हती, तिथूनच आमची केमिस्ट्री तयार झाली. मला मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी नवाझुद्दिनने कंम्फर्ट झोन तयार करुन दिला, त्याने मला अगदी व्यवस्थित माझे पात्र साकारण्यासाठी खूप मदत केली.” असं झीशानने ‘आज तक’ सोबत मुलाखतीत सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com