Narendra Modi Birthday : शाहरुख खान-अजय देवगणसह या बॉलिवूड सेलिब्रिटींनी पंतप्रधान मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत.
Narendra Modi Birthday
Narendra Modi Birthday Saam Tv

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी( Prime Minister Narendra Modi) आज ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवसानिमित्त सर्वजण पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत आहेत. या यादीत बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. शाहरुख खान(Shahrukh Khan), अक्षय कुमार, अजय देवगण, कंगना रणौत, आलिया भट्ट, शिल्पा शेट्टी, अनिल कपूर, कैलाश खेर,सोनू सूदपासून, अभिषेक बच्चन, सनी देओल आणि अनुपम खेरपर्यंत अनेक बॉलिवूड दिग्गजांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत.

Narendra Modi Birthday
विद्या बालन करण जोहरच्या 'कॉफी विथ करण सीझन ७' मध्ये? मजेशीर व्हिडिओ व्हायरल

शाहरुख खानने खास पद्धतीने पंतप्रधान मोदींना शुभेच्या देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांचे कौतुक केले आहे. किंग खानने ट्विटमध्ये लिहिले की, 'आपल्या देशाच्या आणि लोकांच्या कल्याणासाठी तुमचे समर्पण अत्यंत प्रशंसनीय आहे. तुमची सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्हाला शक्ती आणि आरोग्य मिळो. एक दिवस सुट्टी घ्या आणि आपल्या वाढदिवसाचा आनंद घ्या, सर. वाढदिवसाच्या शुभेच्छा.'

Narendra Modi Birthday
PM मोदी पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्व; कंगनाने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

शाहरुख खानच्या पोस्टप्रमाणे अजय देवगणनेही आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'माननीय पंतप्रधान, तुमचे नेतृत्व मला आणि इतर अनेकांना प्रेरणा देते. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि येणार्‍या वर्षासाठी शुभेच्छा सर.' या पोस्टसोबत अजयने पंतप्रधानांसोबतचा स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे.

अभिनेत्री आलिया भट्टने पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले की, आदरणीय पंतप्रधान तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी तुम्हाला उत्तम आरोग्य आणि आयुष्यभर प्रेरणादायी नेतृत्वासाठी शुभेच्छा देतो.

अनुपम खेर यांनी नरेंद्र मोदींचा व्हिडिओ शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, 'आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो. तुमची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहात आणि वर्षानुवर्षे ते करत राहाल. तुमच्या नेतृत्वाबद्दल धन्यवाद.

पंतप्रधानांना शुभेच्या देताना अभिषेक बच्चन यांनी लिहिले, 'आमच्या माननीय पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..'

अनिल कपूरने ट्विटरवर पीएम मोदींसोबतचे दोन फोटो शेअर करून त्यांना शुभेच्या दिल्या आहेत. त्यासोबत लिहिले आहे की, 'ज्या व्यक्तीने भारताला जगाच्या नकाशावर इतक्या उंचीवर नेले आहे, की ज्याची आपण कल्पनाही केली नसेल, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या गौरवशाली राष्ट्राचे नेते. तुम्ही दीर्घायुष्य आणि निरोगी राहा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com