Anushka Sharma: 'चकदा एक्सप्रेस'चे रॅप अप, अनुष्काने शेअर केले सेटवरील खास फोटो

अनुष्का शर्माने 'चकदा एक्सप्रेस'चे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले अशी पोस्ट केली आहे.
Chakda Express Wrap-Up Photo
Chakda Express Wrap-Up PhotoInstagram @anushkasharma

Chakda Express Update: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच चर्चेत असते. तिची प्युमा इंडियासाठी केलेल्या पोस्टची खूपच चर्चा झाली होती. अनुष्का सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती नेहमीच तिच्या कामाविषयीच्या पोस्ट चाहत्यांसाठी शेअर करत असते. अशीच एक पोस्ट अनुष्काने नुकतीच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

अनुष्का सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटमध्ये व्यस्त होती. अनुष्का 'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटाचे शूटिंग करत होती. हा चित्रपट माजी भारतीय महिला क्रिक्रेटपटू झूलन गोस्वामीवर आधारित आहेत. नुकताच चित्रपटाच्या शेवटच्या भागाचे शूट पूर्ण झाले आहे आणि याचीच माहिती देणारी पोस्ट अनुष्काने केली आहे. (Anushka Sharma)

Chakda Express Wrap-Up Photo
Raju Shrivastav: राजू श्रीवास्तव पत्नी करणार त्यांचे स्वप्न पूर्ण, राजकारणात करणार प्रवेश

अनुष्का शर्माने 'चकदा एक्सप्रेस'चे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले अशी पोस्ट केली आहे. तसेच तिने काही फोटो देखील तिच्या इन्स्टाग्राम शेअर केले आहेत. 'इट्स रॅप अप ऑन चकदा एक्सप्रेस' असे म्हणत तिने सेटवरील फोटो पोस्ट केले आहेत. झूलन गोस्वामीने चित्रपटाच्या फायनल शॉटसाठी क्लॅप दिला आहे. म्हणून अनुष्काने झूलन गोस्वामीचे आभार देखील मानले आहेत.

अनुष्का शर्माने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अनुष्का भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीमध्ये दिसत आहेत. तिच्यासोबत झूलन गोस्वामी देखील सेट उपस्थित असल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे. 'चकदा एक्सप्रेस'च्या संपूर्ण टीमने केक कापून काम पूर्ण झाल्याचं आनंद साजरा केला आहे.

दोन लेयर असलेला हा केले फार माहितीपर आहे. केकवर क्रिकेटचे मैदान दाखविण्यात आहे आहे. तसेच २५ नंबर असलेली जर्सी केकवर ठेवण्यात अली आहे. बॉल आणि बेल्स देखील केकवर लावण्यात आले आहेत. 'इट्स अ रॅप अप!'चा क्लॅप सुद्धा केकवर दिसत आहेत. क्लॅपवर चित्रपटाच्या शूटिंगची माहिती लिहिलेली आहेत. या चित्रपटाचे शूटिंग ६५ दिवसात ६ शहरांमध्ये करण्यात आले आहे. (Movie)

अनुष्का शर्माचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. १० मे, २०२३ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार. अनुष्का शर्मा २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'झीरो' चित्रपटामध्ये दिसली होती. तिची मुलगी वामिकाच्या जन्मानंतर हा तिचा पहिला चित्रपट आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com